Widgets Magazine
Widgets Magazine

म्हातारपणात कसं राहायचं

म्हातारपणाला नाव छान
कोणी म्हणत संन्यासाश्रम
कोणी म्हणतं वानप्रस्थाश्रम
मी म्हणतो आनंदाश्रम
 
म्हातारपणात कसं राहायचं
घरात असेल तर आश्रमासारखं
आश्रमात असेल तर घरासारखं
कशातच कुठे गुंतायचं नसतं
 
जुन्या आठवणी काढायच्या नाही
'आमच्या वेळी' म्हणायचं नाही
अपमान झाला समजायचं नाही
उगाच लांबण लावायची नाही
 
सुखाची भट्टी जमवत जायचं
सा-यांशी दोस्ती जुळवत राहायचं
राग लोभाला लांब पळवायचं
आनंद सारखा वाटत जायचं
 
म्हातारपण सुद्धा छान असतं
लेन्स इम्प्लांट ने स्वच्छ दिसतं
नव्या दातांनी सहज चावता येतं
कान यंत्राने ऐकु येतं
 
पार्कात जाऊन फिरुन यावं
क्लबात जाऊन पत्ते कुटावं
देवळात जाऊन भजन करावं
टी.व्ही. मधल्या सिरियल बघावं
 
मुलांसमोर गप्प बसावं
नातवंडांशी खेळत रहावं
बायकोबरोबर भांडत जावं
मित्रांबरोबर बोलत सुटावं
 
जमेल तेंव्हा टूर वर जावं
लायन रोटरी अटेण्ड करावं
वेळ असेल तर गाण गावं
कंटाळा आला झोपुन जावं
 
छान रंगवावी सुरांची मैफल
मस्त जमवावी जेवणाची पंगत
सुरेल जुळवावी गप्पांची संगत
लुटत रहावी जगण्याची गम्मत
 
स्वाद घेत, दाद देत
तृप्त मनानं आनंद घेत
हळुच निघुन जावं
पिकलं पान गळुन पडावं ...
 
आप्त स्वकीय क्षणभर रडतील
दहाव्या-तेराव्याला सर्व जमतील
गोडा-धोडाच जेवल्यावर म्हणतील,
"सुकल पान लोळत नाही पडलं
हसत हसत बघा सुखानं सुटल"Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे

चालता चालता कधीतरी ठेच लागणारच, जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच, ठेच लागणार म्हणून ...

news

सफलता नेहमी चांगल्या.....

सफलता नेहमी चांगल्या विचारातू येते, चांगले विचार हे नेहमी चांगल्या विचार ...

news

अभी अभी तो आयी हो बहार बन के छायी हो...

असं म्हणता म्हणता निरोप घ्यायची निरोप द्यायची वेळ आली ! आले, आले म्हणत ती आली आणि ...

news

दिन दिन दिवाळी भावाला ओवाळी.....

दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी . . . . वसुबारसेला ।।१।। दिन दिन दिवाळी आरोग्य ...

Widgets Magazine