testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे

सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे
घर-दार पाठी बांधून
पोटासाठी पळते आहे
पोरे नवरा दूध चहा
मधेच आजचा पेपर पहा
आले गेले पाव्हणे रावळे
सासरे कायम तडकलेले
सासू सासरे पिकली पाने डॉक्टरकडे पळते आहे
सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे

नवरा म्हणतो हसली पाहिजे
चौघात उठून दिसली पाहिजे
मुले म्हणती आई हवी
घ्यायची आहे सॅक नवी
बायको आई वहिनी सून
सा-या साच्यात बसते आहे
सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे
नशिब बांधून मनगटाशी
आता गाठ ऑफीसाशी
बॉस ,प्रोजेक्ट ,रिव्ह्यू, मेल
घरून मेसेज पहा सेल
संध्याकाळी पोळी भाजी, सासूची संकष्टि आहे
सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे

आता मात्र पळुनपळुन सुपरवुमन दमते आहे
पाठ, मान, पाय, डोके
मन सुध्दा दुखते आहे
कोणी नाही बोलत काही
दोन घोट चहा नाही
पुन्हा पेनकिलर घेऊन
ओले डोळे पुसते आहेे
सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे
घर-दार पाठी बांधून
पोटासाठी पळते आहे


यावर अधिक वाचा :