कसे मान्य करावे? वय झाले

रविवार, 14 मे 2017 (20:37 IST)

Widgets Magazine

कसे मान्य करावे? वय झाले      
आता कुठे जीवन सुरू झाले  
जरी जीवन पन्नाशीला आले    
                     कसे मान्य करावे?
 
बालपण खेळण्यात गुंतले  
कुमार वयाला अभ्यासाने घेरले 
तारूण्य करीअरसाठी घातले 
जग रहाटी म्हणून लग्न  केले
मुलांचे भविष्य त्यात घडविले
वाटले, जीवन आता सुरू करावे
अन् ,तुम्ही  म्हणता वय झाले
                     कसे मान्य करावे?
 
 वयात या आवडी निवडी जपावे
 राहिले छंद ते पुरे करावे 
 जग फिरायचे फिरून घ्यावे 
मित्रांसवे वय विसरावे
जगणे आता सुरू करावे
अन् तुम्ही  म्हणता वय झाले?
                 कसे मान्य करावे?
 
राहीलेले जीवन जगून घ्यावे
सुखदुःखाना का आठवावे?
भेटतील साथी संगे घ्यावे
क्षणा-क्षणाला जगून घ्यावे
वयाचे बंधन कश्याला असावे?
अन् तुम्ही  म्हणता वय झाले
                  कसे मान्य करावे?Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

तू आहे तर माझं मुल

मुलगा: आई.... मी जन्माला कसा आलोय? आई: मी एका बॉक्समध्ये मिठाई ठेवली होती, काही दिवसाने ...

news

बघा जमल्यास विचार करुन…..

तलवारीची जागा आता Android ने घेतली, त्या नादातच आजकालची कारटी ऊशिरा झोपली… माहीत नाही ...

news

बिनडोक कुठले!

तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो ... "अंगठा मारुन झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये "

news

टाइमपास

मुलगी: आय लव्ह यू मुलगा: आय लव्ह यू टू मुलगी: तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? मुलगा: ...