testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

" कणिक अशीच भिजली पाहिजे , भांडी तशीच लावली पाहिजेत ."

mother
" कणिक अशीच भिजली पाहिजे , भांडी तशीच लावली पाहिजेत ."
तिला आठवलं ती हि असाच वाद घालायची तिच्या आईशी . आईचे हात चालायचे सोबत शब्दांची महिरप “ ताक झाल्यावर गंज नीट निपटून घ्यायचा , लोण्याचा गोळा गरगरीत दिसला पाहिजे ,खरकटी भांडी तशीच मोरीत टाकायची नाही, एकतर अन्न शिळं झालं कि दुर्गंध येतो आणि दुसरं म्हणजे भांडी घासणारी मावशी सुद्धा माणूस आहे तिला आपली कुठलीही घाण साफ करायला लावायची नाही . माणसाला माणूस म्हणून वागवायला हवे किंवा मान दिला तरच मान मिळतो वगैरे ”
या सगळ्या सूचनांचा जाच वाटे तेव्हा.
साधं कपड्याला हातशिलाई करायची झाली तरी आई मागे असायचीच " प्रत्येक टाका एकसारखा सुबक नेटकाच यायला हवा , शिवण
नक्षीसारखी दिसली पाहिजे " तेव्हा या सगळ्या गोष्टी किचकटपणाच्या वाटत कारण लक्ष बाहेरच्या मित्रमैत्रिणींमध्ये गुंतलेलं असे . या असल्या गोष्टींमध्ये कशाला वेळ घालवत बसायचं ? काम झाल्याशी काम म्हणत आईचं म्हणणं धुडकावलं जात असे .
आज आई झाल्यावर मात्र
कळतंय , आई होणं हि खूप छान प्रोसेस असते आणि त्यामध्ये खूप खोल अर्थ आपोआप येत जातो .
"चल तुला शिकवते " असं प्रत्यक्ष न म्हणताही आई सतत काहीतरी शिकवत असते, संस्कार-संस्कृती असे मोठे शब्द न वापरता ती ते जगत असते तिलाही ठावूक नसतं आणि आपण केवढं काय शिकलो हे लेकीला सुद्धा कळत नाही . मात्र लेक शिकतच असते आणि प्रत्यक्ष आई झाल्यावर तीच लेक आईच्या समंजस प्रौढ भूमिकेत अलगद शिरते . शिकण्या-शिकवण्याचे
नितांत सुंदर चक्र निरंतर फिरत राहते जगाला समृद्ध करत , पुढे नेत


यावर अधिक वाचा :

काजल ने घेतले पत्रकारितेचे प्रशिक्षण

national news
दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूडध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका मिळवली आणि ...

रणकपूरचे जैन मंदिर

national news
अजोड स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी राजस्थान प्रसिद्ध आहे. याच राजस्थानात अरवली पर्वतरांगाजवळ ...

प्रियंकाने मागितले 14 कोटी मानधन !

national news
सध्याच्या घडीला एक ग्लोबल आयकॉन म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्राची ओळख बनली आहे. विविध ...

प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या 'प्रेमवारी'चा मुहूर्त संपन्न

national news
'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं', प्रेमाची हि कधीच न बदलणारी संकल्पना एका ...

'3 इडियट्स' चा सीक्वल येणार

national news
आता लवकरच 3 इडिएट्सचा सीक्वल येत आहे. 2009 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमाचं दिग्दर्शन ...