testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नवरा आणि नारळ !!

Last Modified शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (12:38 IST)
नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच जाणे असं आजी म्हणायची . बरं , घेताना फोडूनही बघता येत नाही.
दोन्हीही कसेही निघाले तरी " पदरी पडले, पवित्र झाले ". दोघांनाही देवघरात स्थान, दोघेही पुज्य.
पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर मद्रासीअण्णाच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे. हल्ली ऑन लाईन साईट वर सगळ्या किमतीचे नवरे असेच रचून ठेवलेले असतात. नारळ म्हटलं कि मला धडधडतं. चांगला ओळखायचा कसा ?

मी उगाचच कानाजवळ नेऊन हलवून वगैरे बघत असे. अण्णाला कळायचं हे गि-हाईक
नवीन आहे. तो आपली जाड पितळी आंगठी दोन तीन नारळावर टांग टांग वाजवून हातात एक नारळ द्यायचा. ये, लो ! म्हणायचा. मी विचारायचो "खवट" निकलेगा तो ? तो म्हणायचा "तुम्हारा नसीब !!"
आजी म्हणायची नारळ गोड निघाला तर दडपे पोहे, सोलकढी व खोब-याच्या वड्या आणि काय काय !

खवट निघाला तर पाण्यात उकळून वर तरंगणारं कच्च तेल बाजूला घ्यायचं. घाणीवरचं असतं तसं. कापलं, भाजलं, ओठ फुटले, टाचाना भेगा पडल्या, केसांना लावलं, थंडीत चोळलं, दुखऱ्या कानात टाकलं, उत्तम घरगुती औषध. किती उपयोगी....किती बहुगुणी !!

थोडक्यात काय,
नवरा काय ? नारळ काय ? गोड निघाला तर नशीब, खवट निघाला तर उपयोगी, हे कोकणी तत्त्वज्ञान.

ह्याला जीवन ऐसे नांव !!

पु ल देशपांडे....


यावर अधिक वाचा :

दिमाखात पार पडला 'बॉईज २' चा ट्रेलर

national news
तरुणाईवर आधारित सिनेमा म्हंटला कि त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच ! खास करून जर तो सिनेमा ...

दिल्लीच्या मादाम तुसाँमध्ये सनी लिओनीचा मेणाचा पुतळा

national news
नवी दिल्ली येथे असणाऱ्या मादाम तुसाँ संग्रहालयात आता अभिनेत्री सनी लिओनीचा मेणाचा पुतळा ...

पुन्हा एकदा सचिन पिळगांवकर ट्रोल

national news
अभिनेते सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. नुकतेच त्यांनी गायलेले आणखी एक गाणे ...

बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज

national news
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज झाला आहे. या ...

विमानतळावर सनीचा भन्नाट भांगडा

national news
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. सनी सर्रास ...