testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...

jokes
Last Modified शुक्रवार, 6 जुलै 2018 (12:31 IST)
सकाळच्या धामधुमीत असली की फक्त जरा गरमागरम डब्यांची झाकणे लावा. पोरांची तयारी करते तेव्हा जरा बॅग उचलून हातात द्या. ऑफिसला निघताना "आज लवकर येतो " असं जरा हसून म्हणा. ऑफिसला गेल्यावर एक मीस कॉल देऊन कळवा पोहचलो ग व्यवस्थित. उगाच तिला असाच छान नवरा बायकोचा विनोद पाठवा. संध्याकाळी घरी आलात की हसून तिला मिठीत घ्या.
तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...

कधीतरी सुट्टीच्या दिवशी तिला निवांत झोपू द्या. आवडीचा नाश्ता आणि चहा बनवून मग तिला उठवा. उगाच काही कारण नसताना तिच्या आई वडिलांशी बोला. तिला फोन देताना मात्र "झालं बरं माझं तक्रार करून" असं उगाच चिडवा. तिच्या मित्र मैत्रिणीच्या टवाळक्या चर्चेत उगाच तिला टाळी द्या.

तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...
कधी फावल्या वेळेत "बस जरा डोक्याची मालिश करून देतो" म्हणा. कधी ती अंघोळ करून आली की लाडाने तिचे केस पुसत गप्पा मारा. तिच्या प्रत्येक ओल्या बटीला अलगद कळून येईल असे खेचा. चिडणार नाही ती, " काय रे तू पण, बघ ना जरा नीट" म्हणून खोटा त्रागा करते. हसून जिरवा.

तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...

कधी किचन मध्ये गुरफटली असेल तर उगाच जाऊन तिथे भुणभुण घाला. कधीतरी आईपेक्षा काही चांगला स्वैंपाक केलाय बिनधास्त सांगा. एका हाताला तिला घेऊन दुसऱ्या हाती लेकराला घेऊन भर बाजारात चाला. न आवडत्या शॉपिंगला पण "तुझी चॉईस भन्नाट बाबा" असं म्हणून जिरवा.

तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...

तिला जास्त काही लागत नसतं. तिची ती खूप समर्थ आहे. पण ती वेडी खूप भावनिक असते. गुंतून पडलेली असते तुमच्या क्षणाक्षणामध्ये. तुम्हालाही तिच्या प्रत्येक क्षणाचे आकर्षण असते ह्याची तिला
जाणीव करून देत राहा. जगण्याची कारणे खूप आहेत पण सगळ्यात महत्त्वाचे कारण ती आहे हे तिला कधीतरी कळू द्या.

तिच्यावर प्रेम करणं खरंच जास्त अवघड नाहीये....


यावर अधिक वाचा :

इरफानने सुजीत सरकारचा चित्रपट साईन केला

national news
अभिनेता इरफान खान लवकरच एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने सुजीत ...

ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचे निधन

national news
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या निमकी मुखिया ...

तर बॉलिवूडध्ये आलीच नसती कॅटरिना

national news
सिंग इज किंग, वेलकम, एक था टायगर, जब तक है जान, अगदी अलीकडचा टायगर जिंदा है यासारखे अनेक ...

कर्मामुळेच देहाचं मूल्य हि वाढतं.....!!

national news
सोन्यात जेव्हा "हिरा" जडवला जातो तेव्हा तो दागिना ...

‘सेक्रेड गेम्स' चे कोणतेही नवीन भाग प्रदर्शित होणार नाही

national news
नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’या वेब सीरिजविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल ...