शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

अप्रतिम संदेश : जगणं

पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वा-याने अचानक पडलं. दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते.  
 
चिमणा - "सकाळी बोलूयात"
चिमणी - "हो"
 
रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला.चिमणा उत्साहानी म्हणाला, "निघूया? पुन्हा नव्या काड्या आणू.
"तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा - "अग वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत!चल निघूया" आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली...यालाच म्हणतात  
 जगणं