testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

माणसाने वय वाढल्यावर जेष्ठ व्हावे, म्हातारे नाही....

Last Modified गुरूवार, 10 जानेवारी 2019 (16:00 IST)

* माणसाने वय वाढल्यावर जेष्ठ व्हावे, म्हातारे नाही....*

*वय वाढणे हा निसर्गक्रम आहे म्हणून आपण स्वत:ला ‘आता आपण म्हातारे झालो’ असे म्हणू नका.....
* ज्येष्ठत्व व म्हातारपण यांतील फरक समजून घ्या.*

* म्हातारपण इतरांचा आधार शोधीत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते.*

* म्हातारपण लपवावेसे वाटते, तर ज्येष्ठत्व दाखवावेसे वाटते.*

* म्हातारपण अहंकारी आणि हेकेखोर असते, तर ज्येष्ठत्व अनुभवसंपन्न, विनम्र व संयमी असते.*

* विचारले तरच ज्येष्ठ व्यक्ती सल्ला देते वा सुचविते.*
* म्हातारपण जीवनाच्या संध्याछायेत मरणाची वाट पाहत दिवस काढते, तर ज्येष्ठत्व संध्याछायेत उष:कालाची वाट पाहत बालांच्या क्रीडा, तरुणांचे दीपवणारे कर्तृत्व कौतुकाने पाहत आनंदाने, समाधानाने जीवन जगते.*

* म्हातारपण तरुणांच्या जीवनात लुडबुड करते, तर जेष्ठत्व तरुणांना त्यांच्या मताप्रमाणे जगण्याचा अवकाश देते.*

* म्हातारपण 'आमच्या वेळी असे होते...' अशी किरकिर लावते, तर जेष्ठत्व बदलत्या काळाशी जुळवून घेते.*
* म्हातारपण आपली मते तरुणाईवर लादू पहाते, तर जेष्ठत्व तरुणाईची मते जाणून घेते.*

* म्हणूनच ज्येष्ठांनो, मानाने, आनंदाने, समाधानाने जगा. तुमचा अनुभव व ज्ञान, सामाजिक बांधिलकी म्हणून कुटुंबाला
आणि समाजाला द्या. म्हातारे होऊ नका तर जेष्ठ व्हा.*

* चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तरी कपाळावर (नापसंतीच्या आठ्या ) स्पीड ब्रेकर्स पडू देऊ नका. आपली दु:खे उगाळीत बसू नका. मितभाषी व्हा. जीवन आनंदी व सुंदर आहे. जगाबरोबर जगण्याचा प्रयत्न करीत राहा.*
मित्रांनो, प्रत्येक घरातील जेष्ठांनी असे राहायचा प्रयत्न केला तर संध्याछायांना न भिता त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांनाही समृद्ध जीवन जगता येईल, आणि त्यांच्या जीवनात आनंदाचा झरा वाहू लागेल, हे निश्चित.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

कंगनाची करणी सेनेला चेतावणी, मी सुद्धा राजपूत आहे, नष्ट ...

national news
मणिकर्णिका या चित्रपटात झांसीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका बजावणारी चित्रपट अभिनेत्री कंगना ...

ठाकरे सिनेमातला आवाज बदला

national news
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. यात बाळासाहेब ...

उरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी

national news
पायरेसीमुळे संपूर्ण जगाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी ...

'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का

national news
सत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे ...

नेटफ्लिक्स, हॉटस्टारने नियमावली बनवली

national news
नेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका ...