बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2019 (10:49 IST)

जगण्याचा वीट येऊ नये म्हणून....

वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर 
ठेऊ नका डोळा 
एकत्र या गोड बोला  
मार्ग निघतील सोळा  
 
नाते संबध बिघडण्याचे  
हे एक मुख्य कारण  
आपल्याच माणसाचं 
करू नये वस्त्रहारण  

योग्य वाटे केल्यामुळे  
नाते टिकून राहातील  
कार्य प्रसंगी बहीण-भाऊ  
जवळ जवळ येतील 
 
दुःख , चिंता आणि क्लेश  
नक्की होतील कमी  
आरोग्य उत्तम राहण्याची  
थोडी फार हामी  
 
येणे जाणे खुंटले की 
माणूस विचार करतो  
म्हणून तर आपला बी.पी. 
खाली वर होतो  
 
डॉक्टर देतात गोळ्या  
पण विचार कसे जातील  
E C G मधल्या रेषा कशा  
पाहिजे तशा येतील ?  
 
त्यातून पुढे छातीत कळ 
किंवा पॅरालिसिस  
उगी कशाला चान्स देता  
शुगर नावाच्या घुशीस  
 
पैसा अडका प्लॉट शेती  
करता कशासाठी  
एक किंवा दोन लेकरं 
प्रत्येकाच्या पोटी  
 
प्रॉपर्टीच्या कागदापेक्षा  
माणसं करावीत गोळा 
नाती-गोती जपून ठेवावी  
करू नये चोळामोळा 
 
क्वालिफाईड ,गडगंज 
झालात म्हणे तुम्ही 
पुतणे ,भाच्चे सोडून देऊन 
करता टॉमी जिमी 
 
कुत्रं प्रामाणिक असलं तरी 
बोलता येत नसतं 
मन हलकं करण्यासाठी  
जिवंत माणूस लागतं  
 
रिलेशन जपल्यामुळे  
गोळ्या होतील कमी  
दीर्घ आयुष्य मिळण्याची  
होती एक हमी 

भावाकडे जात जा  
आणि बहिणालाही बोलवा  
वहिनीला मान देऊन  
साऱ्यांची मनं फुलवा 
 
अरे वेड्या याच्यामुळेच  
नेहमी राहशील फिट  
जगण्याचा तुला कधीच  
येणार नाही वीट