testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पार्वतीने शंकराला आपला पती म्हणून का निवडले?

Last Modified सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (15:32 IST)
वर्गात गुरुजींनी विचारले
पार्वतीने शंकराला आपला पती म्हणून का निवडले?
गण्याने लगेच हात वर केला
गुरुजींनी गण्याला उत्तर देण्यास सांगितले
गण्याने पाच कारणे सांगितली
१) शंकर दिगंबर रहात असल्यामुळे कपडे धुण्याचा त्रास नाही
२) शंकर कंद मुळे खात असल्यामुळे स्वयंपाकाची कींवा पदार्थ बिघडण्याची चिंता नाही
३) शंकराच्या डोक्यावरूनच गंगा वहात असल्याने लांबून पाणी आणायला नको.
४) शंकराच्या डोक्यावरच चंद्र असल्यामुळे लोड शेडींग मधे मेणबत्त्या शोधायला नकोत.
५) शंकराला आई बाप नसल्यामुळे सासू सासर्यांचा जाच नाही.
गुरुजी हिमालयात कैलासावर तप करायला निघून गेले.


यावर अधिक वाचा :