शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Updated : सोमवार, 4 ऑगस्ट 2014 (17:27 IST)

गणप्या आणि पांडू हवलदार

संध्याकाळची वेळ, पोटात बरीच बीअर, अन घर अजून दूर. अगदी नाइलाज झाला म्हणून गणप्या रस्त्याच्या कडेला भिंतीशी उभा राहिला. पण पांडू हवलदाराने त्याला पाहिलेच आणि मध्येच बाजूला ओढले. गणप्या म्हणाला, ''मी येतो चौकीवर, पण मला निदान पुरे करू द्या.

पांडूने परवानगी दिल्याबरोबर गणप्या पहिल्या जागेच्या जवळच 3-4 फुटांवर पुन्हा उभा राहिला व कार्यक्रम आटोपल्यावर हवलदारबरोबर चौकिला गेला.

दुसर्‍या दिवशी हवलदाराने कोर्टाला गणप्याचा गुन्हा समजावून सांगितला. न्यायाधिशांना पटला, पण त्यांनी शिक्षा देण्याआधी रीतसर विचारले, ''स्वत:च्या बचावासाठी तुला काही सांगायचे आहे का?''

गणप्या नम्रपणे म्हणाला, ''न्याधीश महाराज, हे हवलदारसाहेब भिंतीकडे तोंड करून उभे होते. मला वाटले इथे ते करण्यास हरकत नसावी. म्हणून त्यांच्याच शेजारी मीही उभा राहिलो.''

पांडू अर्थात भडकला. ''महराज, हे साफ खोटं आहे. काय पुरावा आहे याच्याकडे?''

गणप्याने विनंती केली. ''आपण गुन्ह्याच्या जागी निरीक्षण करावे.''

न्यायाधीशाने आपल्या अव्वल कारकुनास मोका-ए-वारदातला पाठवले. दुपारी त्यांने येऊन रिपोर्ट दिला. ''होय, महाशय. त्या भिंतीवर आणि खालच्या पदपथावर शेजारी शेजारी दोन ठीकाणी अजूनही ओल्या खुणा आहेत.''