testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

साप्ताहिक राशी भविष्य

astro
वेबदुनिया|
WD
मीन : प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळा. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. मानसिक ताणतणाव जाणविण्याची शक्यता राहते. व्यवसायातील कामातील सरकारी परवाने हाती येतील. सरकारी नोकरीत असणार्‍यांना चांगले लाभ होतील. समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकूण घेवूनच त्यावर आपले मत व्यक्त करा. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. आपले ध्येय गाठण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. शुभदिनांक १८, १९.

वृषभ : व्यवसायात चांगला उत्कर्ष साधता येईल. अपेक्षित ठिकाणी बदली झाल्याने समाधान लाभेल. कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांत विश्‍वास निर्माण करेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल.खोट्या गोष्टी कळल्यामुळे रागाचा पारा उंचावेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल. शुभदिनांक १६, १७.
मिथुन : अचानक सहलीचे आयोजन केले जाईल. संसर्गजन्य विकारासारख्या व्याधींपासून त्रास संभवतो. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. टविरोधकांच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात कराल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. ज्या बातमीची अगदी अतुरतेने वाट पाहात होतात ती समजल्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण येईल. शुभदिनांक १६, १७.
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसर्‍यावर सोपवू नका. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण होत आहे. महत्वाचे निर्णयात योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन लाभेल. भावंडांसोबत सुसंवाद साधाल. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. शुभदिनांक २0, २१.
सिंह : जूनी येणी वसूल होतील. पूर्वी भावंडांशी झालेले मतभेद आपण गोड बोलून नाहिसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन खरेदीचे मनसुबे महिला आखतील. गृहसौख्याचा आनंद लुटाल. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणारे, इमारत बांधकाम व्यवसायात असणार्‍यांना चांगल्या संधी येतील. शुभदिनांक २0.
कन्या : परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. नवीन कल्पना आकार घेतील. सतत शुभशकुनांचा सतत प्रत्यय येईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांना यश देईल. घरातील वातावरण आनंदी राहील. भावाबहिणींशी वागताना भावनिक उद्रेक होणार नाही याची दक्षता घ्या. जवळचे प्रवास सुखकर होतील.शुभदिनांक १६, १७.
तूळ : आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. आपल्याला मताचा समाजात आदर होईल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन वस्तूंची खरेदी होईल. आठवड्याच्या सुरुवातीला कामानिमित्त प्रवास घडून येतील. सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे. मन सैरभैर होणार्‍या घटना घडतील. शुभदिनांक १८,१९.
वृश्चिक : सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. हौसेमौजे खातर खर्च केला जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल. खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील.आपल्या कर्तृत्त्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल. शुभदिनांक २0,२१.
धनु : नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. नावीण्यपू.र्ण कलाकृती मन मोहून घेतील. स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या हौसेमौजे खातर चार पैसे खर्च कराल. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. आर्थिक आवक वाढेल. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. शुभदिनांक १९.
मकर : बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना यश मिळेल. मनस्वास्थ लाभेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. जीवाभावाचे नातेवाईक भेटतील. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. आपली इच्छापूर्ती होईल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. शुभदिनांक २१, २२.
कुंभ : कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. लेखकांच्या हातून टिकात्मक लिखाण होईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. धाडसी निर्णय घेतले जातील. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश मिळेल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. आपले अंदाड अचूक ठरतील. शुभदिनांक १८, १९.
मीन : प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल. जवळचे प्रवास टाळावे. भावाबहिणींसंबंधात ताण तणाव वाढतील. मन सुन्न करणार्‍या घटना घडतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. थोरामोठय़ांच्या आशिर्वादाने, सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराल. महत्वाचे कागदोपत्रीचे व्यवहार मनोजोगे होतील. मनस्वास्थ लाभेल शुभदिनांक २२.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

यामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी

national news
हिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...

कौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा

national news
जेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...

ह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...

national news
ग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...

यावेळी साजरी करा भाऊबीज

national news
पाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. ...

जेव्हा यमराजाला आली यमुनाची आठवण

national news
सूर्याची पत्नी संज्ञा यांना दोन मुलं होती. पुत्राचे नाव यमराज तर पुत्रीचे नाव यमुना असे ...

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...