ऑगस्ट महिन्याचे मासिक भविष्यफल
तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या मदतीशिवाय यश मिळणे सोपे नाही, यासाठी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. देवाची आराधना करा, यामुळे आपले चित्त शांत राहील आणि येणारे कष्ट त्रासदायक ठरणार नाहीत. शत्रू आपले अहित करण्यात सफल ठरू शकतात. जोडीदारासोबत बाचाबाची होऊ शकते. आर्थिक दॄष्ट्याही हा महिना लाभदायक नाही - विशेषकरून महिन्याच्या शेवटी. सुदैवाने भेटलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे जीवनाला नवी दिशा मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. मित्र आणि नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
वृषभ