1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

प्रियंका चोप्रा : वैवाहिक जीवनात अडचण, करियरदेखील अपूर्ण

वाढदिवसाच्या शुभेच्छा

WD
प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि मिस इंडिया असलेली प्रियंका चोप्राचा जन्म 18 जुलै 1982ला वृषभ राशित झाला. वृषभ राशी असल्यामुळे प्रियंकात कलेचे सर्व गुण आहे.

राशि स्वामी शुक्र हिच्या जन्माच्या वेळेस मिथुन राशीच्या असून दुसर्‍या भावामध्ये वाणीत राहू व बुधासोबत आहे. शुक्राचे मिथुनमध्ये असणे व राहूसोबत युती करणे प्रियंकासाठी उत्तम नाही आहे. चंद्र लग्नातून पराक्रम भावामध्ये सूर्य साहसी बनवतो.

मनोरंजन भाव पंचमाचा स्वामी बुध, शुक्रासोबत आहे. प्रियंकाने बर्‍याच चित्रपटांमध्ये सहनायिका म्हणून भूमिका साकारल्या आहेत.

WD
प्रियंकाच्या पत्रिकेत जन्मवेळेस चंद्र लग्नापासून पंचम भावात शनी-मंगलाची युती असल्यामुळे बर्‍याच काळापर्यंत तिचे चित्रपटात राहणे मुश्कील वाटत आहे. आठवणीतील नायिकांमध्ये तिचे नाव कदाचित येईल.

चंद्र लग्नापासून मंगळ सप्तमेश होतो तसेच शनी भाग्य व कर्माचा स्वामी देखील आहे. या सर्व दृष्टीने बघितले तर तिचे दांपत्य जीवन अडचणीत राहील.

कुठे ना कुठे शनी-मंगळाचा योग विवाहास अडचण निर्माण करत आहे. यापासून बचावाचे उपाय करणे आवश्यक आहे.
वर्तमानात गुरुचे भ्रमण मिथुन राशीपासून द्वितीय भावात होत आहे. हे भ्रमण आयू भावावर स्वदृष्टित असल्यामुळे स्वास्थ्य व आयुच्या बाबतीत ठीक आहे. फिल्मी करियरबद्दल बघितले तर हे वर्ष संमिश्र राहील.