testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

साप्ताहिक राशिभविष्य (30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2014)

astro rashi
वेबदुनिया|
मे
धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आगंतुक पाहुणो येण्याची शक्यता राहते. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. नवनिर्मीतीचा आनंद घ्याल. कवि, कलाकारांना चांगल्या संधींचा लाभ घेता येईल. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करणारे राहील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. खेळाडूंना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. आपल्या कर्तृत्त्वाला चांगली झळाळी मिळेल. > वृषभ > व्यावसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. धनस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आर्तिक उन्नती करणारे राहील. संततीची उन्नती होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता इलेक्टॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल.
मिथुन
तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. आपल्याच राशीतून होणारे चंद्राचे भ्रमणामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपल्या वृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. इच्छापूर्ती होईल.

कर्क
प्रयत्नांती परमेश्‍वर या उक्तीचा प्रत्यय येईल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उंची वस्त्रालंकांरांची खरेदी कराल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. व्ययस्थ चंद्राचे भ्रमण कामानिमित्त दूरचे प्रवास घडवून आणणारे राहील. एखादा निर्णय आपण झटपट घेऊ शकणार नाही. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.

सिंह
सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. लाभस्थ चंद्राचे भ्रमण तरु.णांच्या कौशल्याला चांगला वाव देईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. विश्‍वासाच्या जोरावर मोठे ध्येय गाठाल. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. आपली इच्छापूर्ती होईल. व्यवसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.

कन्या
एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. आकर्षक भेटवस्तू मिळतील. दशमस्थ चंद्राचे भ्रमण व्यवसाय उद्योगातून अभिनव वापरल्यामुळे यश येईल. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. नवीन परिचय होतील.

तूळ
व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल.

वृश्चि
परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. अष्टमस्थ चंद्राभ्रमणामुळे प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. आर्थिक व्यवहारात जामीन राहण्याचे टाळावे. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल.

धन
आपल्या जोडीदारावर आपल्या मतांचा पगडा राहील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल.दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करुन घ्या. भागीदाराचे सहाकार्य चांगले राहील. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल.

मकर
विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल. आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहू नका. वैराण वाळवंटाची वाट संपत आल्याची चिन्हे दिसून येतील. सामाजिक पत उंचावेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. गुप्तवार्ता कानी येतील. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे.

कुंभ
जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.

मीन
कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार्‍या घटना घडतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

शिवाजी महाराज आरती

national news
जयदेव जयदेव जय जय शिवराया ! या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!! आर्यांच्या देशावरि ...

छ. शिवाजी महाराज जयंती: युद्धतंत्राचा निर्माता दिग्दर्शक

national news
जगाच्या पाठीवर अनेक सम्राट झाले. अनेकांनी आपापली साम्राज्ये, सत्ता परकियांना तावडीत जाऊ ...

संकष्टी चतुर्थी व्रत करण्याची सोपी विधी

national news
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षच्या चतुर्थी तिथीला संकट चतुर्थी व्रत केलं जातं. दिवसभर ...

तुकाराम बीज: देहू येथील नांदुरकी वृक्ष आजही हलतो

national news
‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य ...

होळी पूजन, 8 दिवे लावा, सुख-समृद्धीला घराचा रस्ता दाखवा

national news
होळी सणा पूजा विधीचे विशेष लक्ष ठेवले पाहिजे. याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ...

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...