सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

गुलाबाचे फूल

एक होती कमल, तिची बहिण विमल
दोघींनी बेत केला, घरापुढे बाग करू
मग दोघींनी जमीन खणली
वर खत माती घातली
बाजूला विटा लावून जागा तयार झाली
बाबांनी गुलाब आणून दिला
दोघींनी हौसेने तो लावला, पाणी घातले
बरेच दिवस गेले.
PBarnale
गुलाबावर फुले कधी येतात असे दोघींना झाले होते.
एकदिवस कळी आली, विमलने ती पाहिली
तिला फार आनंद झाला
धावत धावत ती आत गेली
तिने कमलला ती दाखवली
दोघींनी घरातील माणसांना ती दाखवली
दोन दिवसांनी फूल फुलले.
ते पाहून विमलला खूप आनंद झाला
ती म्हणाली,
'हे फूल माझ्‍या वेणीत फार सुरेख दिसेल.' कमल म्हणाली,
'वा ग वा! माझ्या वेणीतच हे फार चांगले दिसेल'
विमलने फूल खुडावयास हात पुढे केला.
कमलने फूल खुडावयास हात घातला
दोघींचे भांडण जुंपले, भांडणात फूल कुसकरले.
फूल कोणालाच मिळाले नाही
फुलाची एक पाकळी गाऊ लागली
'विमलेपाशी कमल भांडली।
फूल गुलाबाचे बघुनी।।
दोघींचीही फजिती झाली।
फूल दवडिले कुसकरुनी।।