testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

केवढे हे क्रौर्य !

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रूधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पिकणी.
महणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरिवते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे पभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्र मज मारतील नच ही मनी कलपना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरून घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझया उरीं

निघुन नरजातिला रमिवण्यांत गेले वय,
महणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!
म्हणाल, भुलली जगा, विसरली‍ प्रियां लेकरां
महणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रूधिर वाहुनी नच भिजो सुशयया तरी
म्हणून तरूच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किती सुरम्य ते उत्पल,
नरे धरून नाशिले, खचित थोर बुद्धिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

- ना.वा. टिळक


यावर अधिक वाचा :

फेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत

national news
फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...

फेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार

national news
आता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...

संकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...

national news
संकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...

स्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा

national news
अमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...

चिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी

national news
अल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...