testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ब्लू टेल्ड बी इटर

bird
वेबदुनिया|
PR
हा एक लहान पक्षी असून साधारणपणे बुलबुलच्या आकाराइतका असतो. याच्या डोळ्यांच्या आजूबाजूला काजळाप्रमाणे काळ्या रेषा असतात. गळा फिक्कट भूरकट रंगाचा असतो. बाकी संपूर्ण शरीर गवतासारखे हिरवे असते. नावाप्रमाणेच त्याच्या मागील काही भाग आणि शेपूट निळ्या रंगाची असते. नर आणि मादीमध्ये फारसा फरक नसतो. छोटय़ा- छोटय़ा थव्यांनी हे पक्षी तलाव, सरोवर आणि घनदाट झाडाच्या आसपास राहातात. जवळपास संपूर्ण भारतात हा पक्षी आढळतो. मोकळी मैदाने, जंगले, नद्यांच्या आजूबाजूचा परिसर या ठिकाणी रमणारा हा पक्षी आहे. त्याच्या नावाप्रमाणेच (बी-इटर) ज्या ठिकाणी खाण्याची सोय आहे तेथे तो राहातो.

किडे खाणे त्याला आवडते. मार्च ते जून या काळात हे पक्षी घरटे बनवतात. याचे घरटे अतिशय सुंदर असते. नदीच्या किनार्‍यावर शांत निर्जन कोपर्‍यात मातीच्या किंवा वाळूच्या आत घर बनवतो. या पक्ष्यांची घरे एखाद्या कॉलनीच्या स्वरूपात वसलेली असतात. यांची घरे पुढून अरूंद आणि मागच्या भागात जेथे अंडी घातली जातात तेथे रूंद असतात. एका वेळी मादी पाच ते सात अंडी देते. अंडय़ांचा रंग एकदम पांढरा असतो. नर आणि मादी दोघं मिळून घर बनवतात, अंडी उबवतात आणि आपल्या पिल्लांना खाऊ घालतात, तसेच मुलांना उडणे शिकवतात.


यावर अधिक वाचा :

'ती' ऐतिहासिक भेट रद्द

national news
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ...

राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी,अधिकारी ३० मे ला संपावर

national news
राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० मे रोजी संप पुकारला आहे. भारतीय बँक ...

आयपीएलची फायनल फिक्स असल्याचा दावा

national news
आयपीएलचा दुसरा एलिमिनेटर सामना होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या ...

डास पळवा केवळ 2 मिनिटात

national news
मुंबई : मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार ...

माझा विजय हा छगन भुजबळ यांच्यामुळे शक्य - नरेंद्र दराडे

national news
माझा विजय हा छगन भुजबळ यांच्यामुळे शक्य झाला आहे अशी कबुली स्वतः स्थानिक स्वराज्य ...