testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रामनामाचा महिमा

Last Modified शनिवार, 6 सप्टेंबर 2014 (18:05 IST)

बिरबल जसा विलक्षण बुद्धीचा होता, तसाच तो रामभक्तही होता. अकबर जिथे जिथे म्हणून जायचा तिथे तिथे बिरबल त्यांच्यासोबत असायचाच. असेच एकदा सरकारी कामानिमित्त ते प्रवासास निघाले होते. त्यांच्या प्रवासाची वाट घनदाट अरण्यातून जात होती. प्रवासाने ते आता थकून भागून गेले होते.

अकबरास खूप भूक लागली होती. म्हणून तो जवळपास कुठे एखादी झोपडी दिसते का की जिथे खाण्यासाठी काही मिळेल, असा विचार करून इकडे तिकडे पाहू लागला.
बिरबलासही तो सांगत होता की, जवळपास कुठे एखादे घर दिसते का ते पाहा म्हणून. परंतु बिरबल रामनाम जपात निमग्न होता, त्यामुळे त्याला सांगण्यात काही अर्थ नव्हता.

बिरबलाकडे पाहून अकबर म्हणाला, ‘नुसते रामनाम जपाने कुठे खायला अन्न मिळते का? तू स्वत: प्रयत्न केले पाहिजेस! प्रयत्नाशिवाय तुला काहीही प्राप्त व्हावाचे नाही!’ असे म्हणून अकबराने बिरबलास त्या झाडाच्या सावलीतील जागेत सोडून तिथून दूर काही खायला मिळते का म्हणून शोधायला जायचे ठरविले. अकबर निघाला. थोडे दूर गेल्यावर त्याच्या दृष्टीस एक घर पडले. अकबर त्या घराच्या दिशेने चालला.

आपला राजा अकबर आपल्या घराकडे येत असलेला पाहून त्या घरातील सर्वजण मनोमन अगदी खूश झाले. त्यांनी राजास वंदन करून स्वागत केले. घरी होते ते अन्न राजास खावायास दिले. राजाने पोटभर अन्न ग्रहण केले आणि काही थोडे बिरबलासाठी बांधून घेतले.

तरूतळवटी येऊन अकबराने बांधून आणलेले अन्न बिरबलास दिले. राजा अकबर म्हणत होता, ‘हे बघ बिरबल! मी तुला म्हणालो होतो की नाही. अन्न मिळविण्यासाठी मी थोडेसे प्रयत्न केले आणि मला अन्न मिळाले. तू नुसते रामनाम जपत बसलास, त्याने काय तुला अन्न मिळाले?’
बिरबल म्हणाला, ‘रामनामाचा महिमा मी या आधी कधी इतक्या उत्कटतेने अनुभवला नव्हता! आपण या देशाचे शासक आहात! राजा असूनही अन्नासाठी तुम्हाला याचना करावी लागली! आणि माझ्याकडे बघा. मी तर नुसते या तरुतळवटी रामनाम जपत होतो. त्या
रामनामाने राजास माझ्यासाठी अन्न घेऊन यावास लावले! अशा प्रकारे मला इथे निवांत बसून केवळ रामनाम जपाने, दुसरे काहीही न करता, अन्नग्रहण करावास मिळाले! हाच रामनामाचा महिमा!’


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

कॉन्टॅक्ट लेन्स लावत असाल तर मेकअप करताना घ्या काळजी

national news
अलीकडे आपल्या सौंदर्यात भार घालण्यासाठी अनेक महिला कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. अशावेळी ...

Home Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...

national news
सध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...

रिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे

national news
* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...

अती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर

national news
साखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...

तवा पनीर

national news
पनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...