शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (13:12 IST)

गणपतीला एकदंत का म्हणतात

ब्रह्मवैवर्त पुराणात दिलेल्या माहितीप्रमाणे, एकदा भगवान परशुराम आपल्या इष्ट देवतेला म्हणजेच भगवान शंकराला भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर येतात. त्यावेळी भगवान शंकर माता पार्वतीसोबत आपल्या गुहेत असतात. ते देवी पार्वतीला श्री रामाची कथा ऐकवत असतात. कथेमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून ते गणपतीला आज्ञा देतात की कुणालाही गुहेत आत सोडू नये. 
 
पित्याच्या आज्ञाप्रमाणे  गणेश परशुरामांना भेटण्यासाठी अडवतात भगवान परशुराम श्री गणेशास समजावण्याचा बराच प्रयत्न करतात तरी सुध्दा गणेश परशुरामांना महादेवांची भेट घेण्यास अडवतात. तेव्हा भगवान परशुराम गणेशावर क्रोधित होतात. शेवटी भगवान परशुराम आणि गणेश यांच्यात घणघोर युध्द होते. युद्धात गणपती बाप्पाचा एक दात तुटतो. त्यामुळेच गणेशाला एकदंत हे नाव मिळालं. 
 
ही बातमी भगवान शंकरास समजल्यावर ते बाहर येऊन परशुराम यांना गणपती आपला मुलगा असल्याचं सांगितलं. तेव्हा पार्वतीला सुध्दा ही बातमी समजते आणि त्या क्रोधित होतात. पार्वतीचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान परशुराम गणेशास वरदान देतात कि आता श्री गणेश एकदंत नावानी ओळखले जातील.