सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

गणपतीने आपल्या बुद्धिमत्तेने शर्यत जिंकली

एके दिवस शंकर पार्वतीनं आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावले. गमंत म्हणून दोघा भावंडांमध्ये स्पर्धा ठेवली. स्पर्धा होती की दोघांमधून कोण पृथ्वी प्रदक्षिणा करुन आधी परत येतं. आधी परतणार जिंकेल आणि श्रेष्ठ ठरेल. हे ऐकल्याक्षणी कार्तिकेय 
 
तत्काळ आपल्या वाहनावर म्हणजे मोरावर आरुढ होऊन पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाला. गणपती मात्र कोणत्याच घाईत दिसत नव्हता. त्यांना अगदी सावकाश आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घातली आणि त्यांना वंदन करू लागला.
 
पार्वतीने त्याला म्हटले अरे बाळा तुझा भाऊ कितीतरी पुढे पोहचला असेल आणि तू इथेच. त्यावर गणपती स्मितहास्य करत म्हटले, तुम्ही दोघंच माझं जग आहत आणि तमच्याभोवती प्रदक्षिणा घातली म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याप्रमाणे आहे. हे 
 
ऐकून शंकर पार्वतीला गणपतीचे कौतुक वाटले. त्यांनी गणपतीला म्हटले तू खरंच बुद्धीमान आहेस. आता संपूर्ण जग तुला बुद्धीदाता म्हणून ओळखेल.