सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (22:30 IST)

बोध कथा : देवाचा मित्र

एक लहान मुलगा फाटक्या जुन्या बुटांसह प्लॅस्टिकच्या चेंडूने खेळत होता.लोकांना त्याचे फाटके बूट बघून खूप वाईट वाटले.तेवढ्यात एका गृहस्थाने बाजारातून नवे बूट घेऊन त्याला नेऊन दिले आणि म्हणाले-'' बाळ हे बूट घाल ''. मुलाने लगेचच ते बूट घेऊन घालून घेतले, त्याचा चेहरा आनंदाने चमकत होता. 
 
तो त्या गृहस्था कडे गेला आणि त्यांचा हात धरून म्हणाला-'' आपण देव आहात? आणि त्याने त्यांचा लगेच हात सोडून दिला. ते गृहस्थ त्याला म्हणाले की -'' नाही बाळ मी देव नाही''.
 
त्या मुलाने स्मित हास्य केले आणि म्हणाला '' तर मग आपण नक्कीच देवाचे मित्र असाल.
 
कारण मी कालच देवाला म्हणालो होतो की मला नवे बूट द्यावे.
'' ते गृहस्थ हसले आणि त्या मुलाला जवळ घेऊन त्याचे लाड करून आपल्या घराच्या दिशेने निघाले.त्यांचा मनात समाधान होत.
 
आता त्या गृहस्थांना देखील समजले होते की देवाचा मित्र बनणे काहीच अवघड नाही.