शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (13:24 IST)

बोध कथा : बहिरा बेडूक

एकदा काही बेडकांचा कळप कुठेतरी जात असतो. एकाएकी त्यापैकी 2 बेडूक चालता-चालता खड्यात पडतात. त्यांना पडलेले बघून इतर बेडूक ओरडायला लागतात की आता तुम्ही या खड्ड्यातून कधीही बाहेर येऊ शकणार नाही कारण हा खड्डा खूपच खोल आहे. म्हणून आता तुम्ही या मधून बाहेर निघण्याच्या प्रयत्न काही करू नका. 
 
त्या बेडकांना ते इतर बेडूक काय म्हणत होते हे ऐकायला येत नव्हते ते आप-आपल्यापरीने त्या खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी उडी मारून प्रयत्न करीत होते. त्यांना उडी मारताना बघून वरील बेडूक अजून जोरात ओरडू लागले की अरे तुम्ही वेडे आहात का ? आपले प्रयत्न का व्यर्थ घालवीत आहात, तुम्ही काही या मधून बाहेर पडू शकणार नाही. उगाच प्रयत्न करू नका.तरी ही ते दोघे बेडूक बाहेर पडण्यासाठी आपले प्रयत्न करीत होते.

त्या बेडकांपैकी एका बेडकाला त्यांचे बोलणे ऐकू आले आणि तो निराश होऊन त्या खड्ड्याच्या एका बाजूस जाऊन बसला. पण दुसरा बेडूक सतत प्रयत्न करीत होता. मधून मधून वरील बेडूक त्याला असे करण्यास रोखत होते तरीही त्याचे प्रयत्न त्यामधून बाहेर पडण्यासाठी चालूच होते. अखेर प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजे तो बेडूक शेवटी त्या खड्ड्याच्या बाहेर पडतो.

बाहेर पडल्यावर त्याला इतर बेडूक विचारतात की आम्ही तुला एवढे ओरडून सांगत होतो की तू प्रयत्न करू नकोस तू काही बाहेर येऊ शकणार नाही. पण तू आमचे बोलणे ऐकलेच नाही. त्या बेडकाने त्यांना खूण करीत सांगितले की ते काय म्हणत होते त्याला ऐकायलाच आले नाही कारण तो बहिरा आहे. पण मला असे वाटले की तुम्ही मला बाहेर निघण्यासाठी माझा उत्साह वाढवत आहात त्या मुळे मला त्यामधून बाहेर पडण्याची शक्ती मिळाली आणि मी हार मानली नाही. त्याचे म्हणणे ऐकून सर्व बेडूक स्तब्ध झाले. अशा प्रकारे त्या बेडूकाने हार न मानता आपले प्राण वाचवले.
 
तात्पर्य : आपण स्वतःवर विश्वास ठेवून काम करा यश नक्कीच मिळेल.