शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (15:49 IST)

व्हाईट आणि ब्राऊन ब्रेडमधील फरक आणि आरोग्यासाठी कोणती योग्य? जाणून घ्या

ब्रेड हे जीवनातील दररोज वापरण्यात येणार्‍या फूडपैकी आहे. काही लोकांना पांढरा ब्रेड आवडतो तर काही लोकांना ब्राऊन. पण तुम्हाला माहीत आहे का या दोन ब्रेडमध्ये काय फरक आहे? या दोन ब्रेड केवळ रंगातच एकमेकांपासून भिन्न नाहीत तर त्यांच्यात इतर फरक देखील आहेत. त्यांच्यातील फरक जाणून घेऊया.
 
व्हाईट ब्रेड
व्हाईट ब्रेड बरेच लोक खातात. कारण ती टोस्ट केल्यावर किंवा ग्रिल केल्यावर अधिक क्रिस्पी लागते. व्हाईट ब्रेड मैद्यापासून तयार केली जाते. यामुळेच या ब्रेडचा रंग पांढरा असतो. पांढर्‍या ब्रेड ब्राऊन ब्रेडपेक्षा कमी पोषक असतात. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने कॅलरीज जास्त असतात.
 
ब्राऊन ब्रेड
आरोग्याच्या दृष्टीने अनेक ब्राऊन ब्रेड आपल्या आहारात सामील करतात. याची चव पांढऱ्या ब्रेडपेक्षा किंचित खारट असते. ही ब्रेड साधी देखील खाता येते. पण पांढर्‍या ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड चांगला मानला जातो कारण ज्या पिठापासून ब्राऊन ब्रेड बनवला जातो त्याला कोणत्याही प्रकारची वर्गवारी नसते आणि सर्व पोषक तत्व त्यात असतात. चवीबद्दल बोलायचे झाले तर ब्राऊन ब्रेडची चव देखील चांगली लागते.
 
ब्राऊन ब्रेडमध्ये व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन-ई, मॅग्नेशियम, फॉलिक अॅसिड, जस्त, तांबे आणि मॅंगनीज सारखे अनेक घटक असतात. म्हणून आरोग्यासाठी व्हाईट ब्रेडपेक्षा ही अधिक योग्य असल्याचे मानले जाते.