testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Kitchen Tips In Marathi

स्वयंपाकघरात महिलांचा बराच वेळ जातो. जेवण बनवण्यापासून अन्नपदार्थांची साठवणूक करेपर्यंत महिलांना बरंच काही करावं लागतं. त्यातच भाज्या, त्यातही पालेभाज्या ताज्या ठेवणं हे मोठं आव्हान असतं. यासाठी स्वयंपाकघरातल्या या टिप्स उपयोगी पडतील.

* पालेभाज्या ओलसर होऊ नयेत यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातच आपल्याकडे विशिष्ट प्रकारचे कंटेनर्स असतातच असं नाही पण पालेभाज्या ताज्या ठेवण्यासाठी सोपी पद्धत वापरता येईल. कंटेनरमध्ये भाजी ठेवा. त्यावर पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपर गुंडाळा. त्यावर प्लास्टिक गुंडाळा. पेपर टॉवेलमुळे पालेभाजीतला सगळा ओलावा शोषला जाईल. पालेभाजी बराच काळापर्यंत ताजी राहील.

* लसून सोलणं हे वैतागवाणं काम असतं. यात खूप वेळ जातो. पण लसूण सोलण्याचीही सोपी पद्धत आहे. लसणाच्या पाकळ्य काढून घ्या. या पाकळ्या हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा. झाकण लावा आणि कंटेनर जोरात हलवा. लसणाची सालं झटपट निघतील.

* रस काढण्यासाठी आपण फळं थोडी नरम करून घेतो. पण याऐवजी रस काढण्या आधी फळं 10 ते 30 सेकंदांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवता येतील. यामुळे सगळा रस झटपट काढता येईल.

* उकडलेलं अंडं सोलणं ही एक कला आहे. चुकीच्या पद्धतीने अंडं सोलल्यास खराब होतं. अंडं सोलण्याची एक सोपी पद्धत आहे. एका ग्लासमध्ये अंडं ठेऊन त्यात पाणी भरा. ग्लासच्या वरच्या भागावर हात ठेऊन जोरात हलवा. अंडं सोललं जाईल.

* पिझ्झाचा कुरकुरीतपणा टिकून रहावा यासाठी एक सोपा उपाय करता येईल. मायक्रोवेव्हमध्ये पिझ्झासोबत पाण्याचा ग्लासही ठेवा. यामुळे पिझ्झाचा कुरकुरीतपणा टिकून राहील.


यावर अधिक वाचा :

स्वातंत्र्यदिन आणि आपण

national news
15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या ...

शिवराम हरी राजगुरू

national news
शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व ...

'पुणे' राहण्या आणि जगण्यासाठी सर्वोत्तम

national news
केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विभागाने सोमवारी देशातील राहण्या आणि जगण्यायोग्य शहरांची ...

महागाईचा निर्देशांक नऊ महिन्यांच्या नीचाकांवर

national news
देशातील किरकोळ महागाईचा निर्देशांक नऊ महिन्यांच्या नीचाकांवर म्हणजे ४.१७ टक्क्यांवर ...

विराट - शास्त्रीची चौकशी करण्याची शक्यता

national news
पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे नाराज झालेल्या बीसीसीआय तिसऱ्या कसोटी ...