गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (11:34 IST)

थंड झाल्यावरही पोळ्या मऊ राहतील जर या प्रकारे तयार कराल

असे म्हणतात की प्रत्येकाच्या हाताला वेगवेगळी चव असते. तसचं पोळ्याच्या बाबतीत देखील कोणी पोळ्या मऊ करतं तर एखाद्याच्या हाताची पोळी जरा जाड असते. अशात पोळी गार झाल्यावर खाणे अवघडं होतं म्हणून आपण देखील मऊ पोळ्या करु इच्छित असाल आणि गार झाल्यावर त्याचा आस्वाद घेऊ इच्छित असाल तर या टिप्स खास आपल्यासाठी आहे-
 
पिठ चाळणीतून चाळणे आवश्यक आहे कारण खडबडीच्या पिठाच्या पोळ्या मऊ होत नाहीत. तथापि, चाळण्याने पिठापासून चोकर काढलं जातं. चोकर हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं परंतु या पिठाच्या पोळ्या जाड होतात. पातळ आणि मऊ पोळी तयार करण्यासाठी पीठ चाळावं.
 
पोळी बनवण्यासाठी पिठ आणि पाण्याचे प्रमाण यावर विशेष लक्ष द्या. जर तुम्ही एक वाटी पीठ घेत असाल तर अर्धा कप पाण्याने मळून घ्या. आपण इच्छित असल्यास पीठात एक चतुर्थांश मीठ घाला.
 
पोळ्या तयार करण्यासाठी मऊ मळलेले पीठ असावं ज्याने पोळ्या नरम बनतात. घट्ट पिठाच्या पुर्‍या चांगल्या लागतात.
 
कणीक मळण्यासाठी, ते एका परातीत घेऊन त्याच्या मध्यभागी एक मोठा गड्डा तयार करावा. यात पाणी घालून कोपर्‍यापासून पिठ आत घेत-घेत कणीक मळावी. आवश्यकतेप्रमाणे पाणी शिंपडावं.
 
हाताने पीठ मळून घ्यावं. पाणी इतकंच टाकवं ज्याने ते भांड्याला चिकटू नये. अती घट्ट ही नसावं. मळलेली कणिक इतकी मऊ असावी की बोटाने दाबल्यास सहज दाबता येईल.
 
या पीठावर थोडे तूप किंवा तेल लावा आणि ते कपड्याने 15-20 मिनिटे झाकून ठेवा. असे केल्याने पीठाचा वरचा थर कोरडा होणार नाही.
 
ठराविक वेळेनंतर पुन्हा एकदा कणिक मळून घ्या. एक लाटी करुन त्याला कोरडं पीठ लावून लाटून घ्यावी. गोल पोळी तयार करण्यासाठी लाटी घेऊन हाताने जरा दाबावी. नंतर गरजेप्रमाणे अधून-मधून पीठ लावत मध्यभागी दाबत लाटत जावी. 
 
पोळी तयार झाल्यावर अधिक वेळ पोलपाटावर ठेवू नये. असे केल्याने पोळी फुगत नाही. पोळी तव्यावर टाकण्यापूर्वी हाताने झटकून त्यावर अतिरिक्त पीठ काढून घ्यावं. 
 
तव्यावर पोळी घालताना त्यावर सैल पडू नये याची काळजी घ्यावी. पोळी एकसारखी पसरली पाहिजे. तवा आधी गरम करुन मग आच मंद करुन घ्यावी.
 
आता पोळीला मंद आचेवर एका बाजूने हलकी शेकून घ्या. नंतर पालटून दुसर्‍या बाजूने जरा अधिक वेळ शेकून घ्या.
 
नंतर पोळी तव्यावर काढून थेट फुल गॅसवर शेकावी. कमी शेकलेला भाग शेकावा ज्याने पोळी निश्चित फुलते. पोळ्या शेकताना आच कमी असेल तर पोळ्या मऊ राहणार नाही. अशात आवश्यकतेप्रमाणे आच मध्यम-तेज करत राहा.
 
काही लोक पोळ्या मऊ होण्यासाठी कणिक मळताना त्यात दही किंवा दूध देखील मिसळतात.