testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नातं पत्रातलं....

डॉ. राजेंद्र माने

WD
'तू रोझ डे' ला पिवळा गुलाब दिलास. मैत्रीचं प्रतिक म्हणून.. खरं सांगू! तो घेताना माझे हात थरथरत होते. त्या मानानं माझ्या मैत्रीणी खूप धीट.. मुलांना त्या 'हाय हॅलो' करतात. कधी शेकहॅंड सुध्दा करतात मला त्यांच कौतुक वाटतं... मलाही ते आवडतं रे! पण....

कॉलेजच्या पहिल्या दिवशी मला ऑफिस माहित नव्हतं तेव्हा शोधत इकडं तिकडं तरंगत होते. 'तू काय शोधतेस' आवाज तू दिलास. मला आपुलकिनं ऑफिसही दाखवलसं... पण, मी किती वेंधळी तुला थॅक्सही म्हटलं नाही.. खरं सांगू.. म्हणायचं मनातं आलं होतं पण, धाडस झालं नाही. तशी मी मुळातच कमी बोलणारी. मायी आजी नेहमी म्हणायची 'पूजा तुझं कसं होणारं? सगळ जग बोलण्याच्या भांडवलावर चालते आणी तु समोर ताट आली तरी कोणी 'खा' म्हणेपर्यंत खाणार नाहीस.

अमित... माझी आजी जुन्या काळातली.. काठापदराची नऊवारी नेसणारी. अजूनही आमच्या घरात सणवार जुन्या पध्दतीने साजरे होतात. अशा घरात मी वाढलेली. मला काय म्हणायचेय ते समजलं ना...?

त्या पहिल्या भेटीतला तुझा रेड कलरचा टी-शर्ट मला खूप आवडला होता... त्यावर गोल्डन कलरमध्ये लिहले होते 'you Want friend' ते ही मला खूप आवडलेलं. आणि मग जेव्हा तू मला काल पिवळा गुलाब दिलास तेव्हा मला तेच सगळं आठवलं. खरं सांगायच तर मला तुझी मैत्रीची भाषा आवडली. मला दोन-तीन मैत्रिणी आहेत. पण, आजवच्या आयुष्यातला पहिला मित्र तूच.. 'अमित'

WD
आणखी एक सांगू... तू छान दिसतोस. माझी मैत्रिण निशा म्हटते तू आपल्या कॉलेजच्या 'शाहिद कपूर' आहेस म्हणून. आणि तिनं तसं म्हटल्यापासून खरचं मला तुझ्यात आणि त्याच्यात काही गोष्टी सेम भासायला लागल्या आहेत... आई शप्पथऽऽऽऽ

निशा आणि मी दोघींनी कॉलेजचा पिरियड बंक करून पर्वा 'जब वुई मेट' पाहिला. ग्रेट आहे ना पिक्चर! शाहिद तर किती गोड दिसलाय आणि त्यात तू मला मैत्रिण बनविल्यापासून खरं सांगायचं झालं तर मी थोडी हवेतच आहे. (निशाच असं म्हणाली)

मी तूला एकदम पत्र लिहायला बसलेय... कदाचि‍त हे जरा जास्तच होत नाही नां. निशाला मी हे सांगितलं नाही. ती म्हणजे जरा 'पीळ' आहे. ऊगाच काहीच्या काही सबंध जोडेल. पण, या वयात 'मित्र' मिळाला ही जरा मस्तच वाटतं.

त्या दिवशी आईनं ते पिवळं फूल पाहून विचारलं 'पूजेऽऽऽ' हे कुठून आणलसं... तिला मित्रानं किंवा कॉलेजमधल्या मुलानं दिलं म्हणून सांगितल असतं तर प्रश्नांची सरबत्ती चालू झाली असती. 'कोण तो..', 'नाव काय..', 'मवाली नाही ना..','आई-वडील कुठं असतात' आणि शेवटी 'कोणत्या जातीचा..' वगैरे वगैरे...

आई माझी जरा जास्तच काळजी घेते. तिला तसं म्हटलं तर म्हणते 'आई झालीस की कळेल..' असेलही...

WD
पण, खरी एक गंमत सांगू. आईला 'अमित' नाव आवडतं. तिला अमिताभ बच्चन जाम आवडतो. त्याचे पिक्चर अगदी इनव्हॉल्व होऊन बघत असते. तिच्या कॉलेजच्या वेळी तो जाम फेमस असणार. त्यामुळं तुझं नाव तिला नक्की आवडेल...

परवा डॉली काय म्हणाली माहित आहे? ती मला म्हणाली... 'माझी मैत्री स्विकारशील' असं सांगून मुलं प्रेमाची सुरूवात करतात आणि मुली प्रेमाचा शेवट ' तू फक्त माझा चांगला मित्र आहेस' म्हणून करतात. डॉली असं विचित्र पण, मार्मिक बोलतं असते.

असो.. अच्छा तर मी आता रजा घेते. माझ्या पत्राचं उत्तर पत्रानच दिलसं तर मला आवडेल. आता हे पत्र तुला कसं पोहोचवायचं याचा विचार मी करत आहे. निशाल कळलं तर जाम पीळ देईल.

पूजा...

(क्रमश:)

वेबदुनिया|
लेखक साता-यातील साहित्यीक आहेत.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

एक डाव नियतीचा?

national news
मिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...

तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! !

national news
आईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...

बीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...

national news
हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...

आश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे

national news
कोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...

झेंडूची फुले ही आहे गुणकारी

national news
दोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू ...