testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तव नयनांचे दल हलले गं

love station
ND
तव नयनांचे दल हलले गं
पानावरच्या दवबिंदूपरी
जग सारे डळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

तु्झ्या नुस्त्या डोळ्यातली ताकद काय सांगू. पानावरच्या नाजूकशा दवबिंदूत सारे जग सामावलेलं असतं. तुझ्या पापण्या नुसत्या हलल्या काय नि हे त्रिभूवन अवघं डळमळलं. तुझ्या धनुष्याकृती नयनांत अवघं जग हलवून टाकण्याची ताकद आहे. तिथे माझ्या ह्रदयाची काय कथा.

वारे गळले तारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषी मुनी योगी चळले गं
तव नयनांचे दल हलले गं

तिच्या डोळ्यांच्या पापण्या हलल्या नि त्रिभूवन डळमळलं. वारे हलायला लागले. तारे जागेवरून कोसळले. या मूर्त जगातल्या सगळ्या भौतिक गोष्टी पंचतत्वांसारख्या जागेवरून हलल्या. पर्वत ढासळले, गायकांचे सूरही कोसळले. एवढंच काय तुझ्या त्या हललेल्या पापणीने बडे बडे ऋषी-मुनीही घायाळ झाले. तुझ्या पापणीत या सगळ्यांना चळवण्याची ताकद आहे तिथे माझ्या ह्रदयाची काय कथा.

ऋतुचक्राचे आस उडाले
आकाशातुन शब्द उडाले
आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

तुझ्या पापण्या हलल्या नि ऋतुचक्रही बिघडले. त्यांचे आसच गायब झाले नि ऋतूत ऋतू मिसळून गेले. आकाशातले शब्दही उडून गेले. तुझ्या नयनांचे हे भाले आता तू आवर गं. तुझ्या या जीवघेण्या नजरेने पाण्यातले मासेही तळमळून गेले बघ. तुझ्या पापणीत हे सारे घडविण्याची क्षमता असताना माझ्यासारख्याच्या ह्रदयाची काय कथा.

ह्रुदयी माझ्या चकमक झडली
दो नयनांची किमया घडली
नजर तुझी धरणीला भिडली
पुनरपी जग सावरले गं
तव नयनांचे दल हलले गं

आपल्या उभयतांचे डोळे परस्परां भिडले नि माझ्या ह्रदयात जणू चकमक घडली. माझ्या नजरेला बद्ध करून तुझी नजर जमिनीला भिडली. साऱ्या त्रिभूवनाला डळमळवणारी तुझी नजर अखेर माझ्यावरून धरणीवर स्थिरावली आणि तुझ्या या आश्वासक आधाराने पुन्हा एकदा त्रिभूवन सावरलं. तु्झ्या पापणीने सारं जग हलवलं होतं, तिथे माझ्या ह्रदयाची काय कथा.

वेबदुनिया|

(बा. भ. बोरकराच्या कवितेचे रसग्रहण)


यावर अधिक वाचा :

कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी

national news
केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण ...

धर्मा पाटील कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

national news
मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...

चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये

national news
फ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या ...

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

national news
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना मुंबई ...

शेतकरी कर्जमाफीच्या कामासाठी आजही बँका सुरु

national news
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या ...