मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमगीत
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:06 IST)

सहारा मी होईल तुझा असा

सहारा मी होईल तुझा असा,
कुठं न डगमगणारा भरवसा,
असोत मार्गी खाच खळगे किती,
माझ्या सवे तुज कशाची ग भीती?
असा क्षण नाही येणार जिथं तू एकटी,
मनोधैर्य वाढविन तुझे,रक्षीन तुज संकटी,
कोण मी तुझा, अन तू माझी काय?
प्रश हे जनास पडतील, आपल्यास त्याचे काय?
नकोस जाऊ गोंधळून प्रिये, हो निर्धास्त,
तुझ्यावरील प्रेमाचा कधी न होईल अस्त!
....अश्विनी थत्ते