testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लग्नाच्या पाच वर्षांनंतर...

love station
Last Modified गुरूवार, 31 मे 2018 (13:31 IST)
एका वेळेनंतर प्रत्येक नात्यात बदल होत असतात. सगळीच नाती नेहमी एकसारखी राहात नाहीत. काही बदल चांगले वाटतात तर काही बदल हे नात्याला वेगळ्याच वळणावर घेऊन जातात. नवीन लग्र झाल्यावर पती-पत्नी दोघेही आनंदी असतात. पण लग्नाच्या पाच वर्षांनंतर या नात्यात काही खास बदल बघायला ळितात.
हनीमून
लग्नानंतरचं पहिलं वर्ष हे हनीमून पिरीयडसारखं असतं. आजूबाजूला सगळंच चांगलं वाटत असतं. पण जसजसे दिवस पुढे जातात, दोघेही हनीमून पिरीयडमधून बाहेर येऊ लागतात. जीवनाकडे वेगळ्या नजरेने ते पाहायला लागतात. पण जे लोक या हनीमून मूडमधून बाहेर येत नाहीत, त्यांचं नातं अडचणीत येण्याची अधिक शक्यता असते.
<a class=love station" class="imgCont" height="383" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-06/19/full/1434711912-1898.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="400" />
दुसरं वर्ष
लग्नाच्या दुसर्‍या वर्षात पती-पत्नी एकेमेकांचे स्वभाव आणि एकमेकांच्या सवयी जाणून असतात. चांगल्या सवयीचं काही नाही, पण वाईट सवयीमुळे खटके उडायला लागतात. त्यामुळे सतत छोटी छोटी भांडणं होऊ लागतात. दुसर्‍या वर्षात आर्थिक आणि मानसिक अडचणी, तसेच फॅमिली प्लॅनिंग याचाही विचार असतो त्यामुळे रोमान्स जरा कमीच होतो.
love break
बोलणं कमी
लग्नाच्या दोन-तीन वर्षांनंतर पती-पत्नी आपापल्या जबाबदार्‍यांमध्ये इतके गुंतले जातात की, त्यांना एकेकांसोबत बोलण्याची सवडच मिळत
नाही. दोघेही नोकरी करणारे असले की ही समस्या अधिक होते. घर आणि ऑफिसच्या धावपळीत ते आपलं नातं मागे सोडून आले असतात.
love
भांडणं
ज्या गोष्टी आधी खूप चांगल्या वाटायच्या त्या गोष्टींबद्दल काही काळानंतर चीड यायला लागते. मग यावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडणं होतात. पण दोघांपैकी एकजण समजदार असेल तर भांडण पटकन सोडवलं जाऊ शकतं. पण तसं नसेल तर कठीण आहे.
love station
आधीसारखं प्रेम
लग्नाच्या पाच वर्षांनंतर प्रेम पूर्णपणे संपतं असं नाहीये. पण ते पूर्वीसारखं राहात नाही, ते कमी होतं. आधीसारख्या रोमॅटिंक डेट्‌स, सरप्राईज देणं, प्रमेच्या गोष्टी, अनेक तास सोबत बसणं हे कमी होतं.
संशयाचं भूत
नात्याचा पाया हा विश्र्वासावर रचला जातो. एकदा विश्र्वास गमवला तर नातं टिकवून ठेवणं जरा कठीण होऊन बसतं. आणि विश्र्वास कमी झाल्यावर संशयाचं भूत डोक्यात शिरतं.
नमते घेणे
प्रेम असो वा लग्न भांडण झाल्यावर कुणी एकच सॉरी म्हणतो. एकाने सॉरी म्हटलं की, दोघांमधील वाद संपतो. भांडण मिटतं. त्यामुळे दोघांपैकी एक असा असतोच जो आपली चुकी नसतानाही भांडण मिटवण्यासाठी सॉरी बोलतो.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

प्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)

national news
कु.ऋचा दीपक कर्पे

हेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...

national news
जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...

भंडारा सिल्क अर्थात कोसा साडी

national news
खरं तर फॅशनचं जग ग्लॅमरस आहे. त्यातून एखाद्याला प्रसिद्धी मिळाली की ती फॅशन सर्वसामान्य ...

हँड ड्रायरखाली हात सुकवणं धोकादायक, जाणून घ्या याचे कारण

national news
हॉटेल, थिएटरमध्ये, ‘हँड ड्रायर’खाली हात सुकवणं सर्वाधिक धोकादायक असल्याचं एका संशोधनातून ...

वजन वाढण्याचे एक कारण सलॅड ही असू शकतं!

national news
आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जर आपण डायटिंग करत असाल आणि त्यासाठी सलॅडचे अधिक सेवन ...