शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By वेबदुनिया|

Love Tips : 'प्रेमयोगी' बनाल की 'प्रेमरोगी'?

काही जणांना 'प्रेम योग' होत असतो तर काहींना 'प्रेम रोग'! पण तसे पहिले तर प्रेम योगापेक्षा प्रेम रोगानेचाच अधिक पसार झालेला दिसतो. प्रेम रोगाचा नायनाट करणारे करणारे औषध मात्र अद्याप संशोधकांना सापडलेले नाही आणि कदाचित ते शोधण्याच्या भाणगडीतही पडणार नाही‍त. 

'आय लव्ह यू' बोलण्यापर्यंत 'प्रेम योग' असतो. मात्र 'प्रेम योगाने 'प्रेम योग'च रहायचं क‍ि 'प्रेम रोग' व्हायचं, हे सर्वस्वी समोरच्या व्यक्तीच्या उत्तरावर अवलंबून असतं. ''माझं तुझ्यावर प्रेम जडलंय..., मी तुझ्यावर नि:स्वार्थ प्रेम केले होते...करतोय आणि भविष्यात करत राहीलच...! वैगेरे..वैगेरे. अशी वाक्ये आता केवळ पुस्तकांतच शोभून दिसताहेत.

फिजिकल एट्राक्शन हे प्राण्यांमध्येही असते आणि मानव हा प्राण्‍यांपेक्षा निश्चित वेगळा आहे. 'फिजिकल एट्राक्शन'ला आपण प्रेम म्हणाल का? जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. शरीर सुखाच्या भावनेपेक्षा मनोमिलनाची भावना स्वत:मध्ये जागृत करा. तेव्हाच तर तुम्ही‍ प्रेम योगाचा खरा आनंद प्राप्त करू शकाल.

प्रेम रोगी 
आपण समाजात पाहतो, दररोज प्रेमावरून काही ना काही घडत असते. एकतर्फी प्रेमातून गुन्हेगारीचे प्रमाणही गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत वाढले आहे. कोणी आपल्या प्रेयसीचे नाव हातावर गोंदून घेतो, तर कोणी ब्लेडने स्वत:वर वार करून घेतो. एवढेच नाहीतर प्रियकरासाठी काही तरूणी स्वत:चा जीव देण्यासाठीही मागे- पुढे पाहत नाहीत. काही मुले तर प्रेमात स्वत:ला विसरून जातात व आपल्या रक्ताने प्रेयसीला पत्र लिहून प्रेम किती नि:स्वार्थ आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. 

अशा परिस्थिती प्रेयसी सोडून गेली तर तिचा खून करण्‍यातही आजचे 'प्रेम दिवाने' मागे राहत नाही, याचा काय म्हणणार? खून अथवा आत्महत्या करण्यामागे 'प्रेम' नाही तर 'कामवासना' हेच खरे कारण आहे.

  प्रेम योगी 
'नि:स्वार्थ प्रेम' हे परमेश्वराच्या प्रार्थनेप्रमाणे असते. जो व्यक्ती स्वत:वर प्रेम करतो तोच दुसर्‍यावर प्रेम करू शकतो. 'काटा माझ्या पायी रुतला शूल तुझ्या का रे हृदयी उठला', अशी भावना खर्‍या प्रियकर व प्रेयसीमध्ये असते. प्रेमात त्यागाची भू‍‍मिका महत्त्वाची आहे. 

प्रेमाची व्याख्‍या ही प्रत्येक प्रियकाराने त्याच्या परीने करून घेतली आहे. प्रेमात पडणं सोपं आहे. मात्र ते निभावणं कठीन. म्हणून 'प्रेम योगी' बनायचं की 'प्रेमरोगी' हे प्रत्येकानं आपापलं ठरवलं पाहिजे, नाही का..!