शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By वेबदुनिया|

का रे अबोला, का हा दुरावा

मधुचंद्राची रात्र आनंदात घालवलेले नवविवाहीत जोडपे हळू हळू आपल्या 'रूटीन' जीवनात परत येण्याचा प्रयत्न करतात. सुरवातीचे दिवस चांगले जातात. काही दिवसात जोडीदाराच्या गुणांसोबत दुर्गुणही लक्षात येतात. अगदी लहान लहान गोष्टीवरून दोघांमध्ये खटके उडतात. दोघांमध्ये असलेल्या प्रेमाला ओहोटी लागते. दुरावा वाढतच जातो. एका छताखाली पती- पत्नी अनोळखी रूममेट सारखे राहू लागतात. त्यांच्यात प्रेम कमी आणि भांडणेच जास्त जुंपतात.

नवदांपत्यासाठी सुरवातीचे एक वर्ष काट्यावरचे जाते. सात जन्म परस्परांना साथ देण्यासाठी सप्तपदी घालणार्‍या त्या जोडप्याला ते नाते क्षणात तोडावेसे वाटते. अशा परिस्थितीत दोघांची मानसिक स्थिती ढासळलेली असते. कुठून लग्न केले, असे त्यांना वाटते. कुणालाच एकमेकांची चूक मान्य नसते. मग यातून एकच मार्ग निघतो, तो म्हणजे काडीमोड घेण्याचा अर्थात घटस्फोटाचा. पण काडीमोडापर्यंत प्रकरण येऊच नये यासाठी सुरवातीलाच काही उपाय केले पाहिजे. दांपत्यजीवन सुखी ठेवाण्यासाठी आम्ही काही टिप्स देत आहोत. त्यांचे पालन केले की मग दुरावा नक्कीच दूर होईल.

लग्नाच्या दिवशी सप्‍तपदी घालताना जोडीदाराला दिलेले वचन कधीही विसरता कामा नये. कितीही गंभीर परिस्थिती आली तरी आपल्या जोडीदारावरचे प्रेम कधी कमी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. भावनेच्या भरात आपल्या जोडीदारावर आरोप प्रत्यारोप करून विश्वासाला तडा जाणार नाही याची दोघांनी काळजी घेणे गजरचे आहे.

तणाव वाढण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे. नव्या जीवनाचा श्रीगणेशा करण्यापूर्वी जोडीदाराशी ज्या विषयांवर वाद होऊ शकतात, त्या मुद्यांवर आधी मनात कुठलीही शंका न ठेवता चर्चा करा. आपल्याला दोघांना मिळून काय करायचे आहे, यावर परस्परांचे विचार जाणून घेऊन जीवनाचा उद्देश निश्चित केला पाहिजे. भविष्यात निर्माण होणार्‍या वादांमधील 90 टक्के वाद एका चर्चेने कमी होऊ शकतात.
WD WD

आपण नवजीवनाला प्रारंभ करतो तेव्हा सगळ्यात मोठी समस्या उध्दभवते, ती म्हणजे बजेटची. पैशांच्या खर्चावरून दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जोडीदेरासोबत वाद न घालता त्याला समजून घेतले पाहिजे. आपण जोडीदारावर विश्वास ठेवला पाहिजे. जेथे विश्वास डगमगला तेथे वाद व्हायला वेळ लागत नाही. त्यासाठी आपण वादावर उपचार करण्याआधी वाद होणार नाहीत, अशी काळजी घेऊन आपल्या सुखी संसाराला ग्रहण लागू न देता जोडीदारासोबत सातजन्माच्या प्रवासाला निघाले पाहिजे....