testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जगभर वाढतोय ‘शुद्ध’ ऑफिस रोमान्स !

office
मुंबई| वेबदुनिया|
सध्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे अनेकजण जेवढा वेळ घरी असतात त्यापेक्षा अधिक वेळ ते आपल्या ऑफिसमध्ये असतात. त्यामुळे ऑफिसमधल्या सहका-यांशी होणारे भावनिक संबंध वाढत असून शुद्ध ऑफिस रोमान्सही वाढत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
हॅरिस इंटर अ‍ॅक्टिव्ह या संस्थेने जगभरात केलेल्या एका ऑनलाईन सर्वेक्षणानुसार, १० पैकी ४ जण हे ऑफिसमधल्या कुणाशी तरी भावनिकदृष्ट्या गुंतलेले असतात. याचा अर्थ सर्वच जण डेटिंग किंवा रोमान्स करतात असे नाही. पण काहीजण या गुंत्यात अडकतात आणि कधीतरी सापडतातही.फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटसअ‍ॅपने जोडलेली आजची नवी पिढी नात्यांबद्दल नव्या पद्धतीने विचार करते. कदाचित परंपरा मानणा-यांना हे विचार चुकीचे वाटतील, पण आज अनेकजण ऑफिसच्या सहका-यांशी भावनिक संबंध ठेवतात हे सर्वत्र जाणवते आहे.अनेकदा यात मानसिक आधार शोधण्याचा प्रयत्न तरुण पिढीकडून होत असतो. अशावेळीच ऑफिसमधील तरुण-तरुणी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि एकमेकांच्या जवळही येतात. तसेच ते स्वीकारले जाण्याकडेही कल वाढतो आहे. हे सारे खरे असले तरी ऑफिसच्या व्यवस्थापनासाठी आणि बॉसेससाठी ही डोकेदुखी ठरली आहे. परदेशातील काही ऑफिसनी यासाठी डेटिंग पॉलिसी तयार करण्याची भूमिका घेतली आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंध यांचा परिणाम ऑफिसच्या कामावर होऊ नये, या उद्देशाने या पॉलिसीची रचना केली जाते.


यावर अधिक वाचा :