शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (10:00 IST)

प्रेम वाढविण्यासाठी काही लव्ह टिप्स

प्रेमाची अनुभूती खूपच सुखद आहे.प्रेमरूपी रोपटं वाढविण्यासाठी त्याची जोपासना करावी लागते. आणि हे परस्पर दोघांनी मिळून करायचे असते. कोणत्याही नात्याची सुरुवात आहे एकमेकांवरच प्रेम. ते प्रेम नेहमी बहरत राहावं या साठी आम्ही काही लव्ह टिप्स सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे त्या टिप्स.
 
 
*आपण वाटेतून पायी चालताना आपल्या जोडीदाराचा हात धरून चला.   
 
* आपल्या जोडीदाराच्या प्रति नेहमी प्रामाणिक राहा.
 
* एकाद्या गोष्टीवर वाद झाला असेल तर भांडण विसरून एकमेकांना मनवा.
 
* गर्लफ्रेंड/बायकोचा वाढदिवस नेहमी लक्षात ठेवा आणि त्या दिवसाला त्यांना जास्त वेळ देऊन दिवस खास बनवा.
 
* जर आपली गर्लफ्रेंड/बायको आपल्यासाठी उपवास करत आहे, आपण देखील त्यामध्ये सामील व्हा.
 
* त्यांचे काही लाडाचे टोपण नाव ठेवा आणि त्यांना त्याच नावाने हाक मारा. लक्षात ठेवा की नाव असं ठेवा ज्या मधून त्यांना आपले प्रेम दिसेल. 
 
* आपण आपल्या गर्लफ्रेंड/ बायकोला आपले निर्णय बळजबरी ऐकण्यास भाग पडू नका, या मुळे त्यांना अस्वस्थ होईल आणि आपल्यासाठी असलेले प्रेम देखील कमी होऊ शकत.
 
* शक्य असल्यास आपल्या गर्लफ्रेंड/बायकोचे फोटो फोनच्या वॉलपेपर वर लावा.
 
* बोलताना नेहमी स्वतःबद्दलच बोलू नका आपल्या जोडीदाराला देखील मोकळ्या पणाने बोलू द्या.
 
* आपला मित्र/ नवरा एखाद्या महिलेशी बोलत असल्यास राग करू नका, त्याच्या वर विश्वास ठेवा.
 
* आपल्या नवऱ्याला /बॉयफ्रेंड च्या आवडीचे काही बनवून खाऊ घाला.
 
* ऑफिसातून नवरा  थकून घरी आल्यावर त्याला चांगली वागणूक द्या.
 
* आपल्या बॉयफ्रेंड/नवऱ्याला काही सरप्राइज भेट वस्तू द्या.
 
* नेहमी त्यांच्या साठी आनंदी राहा.
 
* आपल्या बॉयफ्रेंड/नवऱ्याला थोडी मोकळीक द्या. त्यांच्या फोन वारंवार तपासून बघू नका.