testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तुमचेही तुमच्या पार्टनरसोबत सतत ब्रेकअप होते?

love break
Last Modified गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (13:06 IST)
तुमचे तुमच्या रोमँटिक पार्टनरसोबत सतत ब्रेक अप होत असेल आणि लगेचच तुम्ही एकत्र येत असाल तर तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे. कारण याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
अभ्यासादरम्यान असे दिसून आले, की नात्यामध्ये सतत दुरावा निर्माण होत जातो आणि शेवटी ब्रेक अप होत असते. मात्र, काही जोडपी ब्रेकअप झाल्यावरही पुन्हा जवळ येतात. यामुळे उदासीनता आणि चिंता यांसारख्या मानसिक समस्यांचा त्रास होण्याची शक्यता बळावत असते. नात्याचा दुरुपयोग करणे, अतिशय कमी दर्जाचा संवाद आणि एकेकांमध्ये बांधिलकी नसणे यामुळे नात्यामधील गोडवा कमी होत जातो. अशाच नात्यामधून मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. ब्रेकअप करून पुन्हा एकत्र येणे हे प्रत्येकच जोडप्यासाठी धोक्याची घंटा असतेच असे नाही. खरे तर काही जोडप्यांना ब्रेकअपमुळे त्यांच्या नात्याचे महत्त्व कळत असते. यामुळे ते आपले नाते अधिक घट्ट बनवण्याचा प्रयत्न करतात तसेच त्यांच्याधील बांधिलकी वाढत जाते, असे अेरिकेतील मिसोरी विापीठाच्या साहाय्यक प्राध्यापिका केल माँक यांनी सांगितले.
प्रेमाच्या नात्यात अडकलेल्या 500 प्रेमी युगलांवर संशोधन करण्यात आले. ब्रेकअप झाल्यानंतर जोडपी गरजेनुसार एकत्र येतात की व्यावहारिकपणे एकत्र येतात, या दोन बाबींना अनुसरून अभ्यास करण्यात आला.

संशोधनानुसार, कोणी फक्त आर्थिक गरजांसाठी नातेसंबंध जपत असतात तर कुणी जीवनाचा एक भाग म्हणून आपले नाते अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, प्रेमामध्ये कुठलेही बंधन न ठेवता सर्पणाच्या भावनेने एकत्र येणे गरजेचे असते. सतत ब्रेकअप होत असलेल्यांनी आपले संबंध काय ठेवण्यासाठी किंवा सुरक्षितपणे त्याचा शेवट करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. जर तुमचा पार्टनर अगदीच प्रामाणिक असेल तर तो नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करेल. नाही तर अगदी सुरक्षितपणे त्या नात्याचा शेवट करेल. प्रत्येक जोडीदाराच्या मानसिक आरोग्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे, असेही माँक म्हणाल्या.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

मधाचे 5 औषधी उपचार

national news
मध वापरण्याने आपण अनेक किरकोळ रोग टाळू शकतो. जाणून घ्या मधाचे 5 घरगुती उपचार - 1. ...

नागरी सहकारी बँकांची ऑनलाईन पद्धतीने नोकरभरती

national news
राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांनी स्टाफिंग पॅटर्न निश्‍चित करावा. सोबतच बॅकांनी ऑनलाईन ...

जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे

national news
चांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...

साखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार

national news
स्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...

नवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी

national news
उपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...