रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 (16:33 IST)

शांतता... फराळ सुरु आहे...!

आपल्या घरात शांततेत खमंग फराळ होण्यासाठी काही टिप्स...
*शांतता... फराळ सुरु आहे...!*
 
बायको फराळ करत असतांना सोफ्यावर पाय पसरून मॅच बघू नका ..
मोबाईल शक्यतो लांब ठेवा , रिल्स बघण्याची तर हा वेळ अजिबातच नाही ....धोका पत्करू नका ...
एका जागेवर जास्त वेळ बसू नका. या मुळे आपण काहीच काम करत नाही हे लक्ष्यात आल्यास एखादे काम पदरी पडेल ...
एखादे काम मिळाल्यास खूप वेळ लावा. डब्यात काही भरून द्यायचे असेल तर सांडलवण केल्याशिवाय भरू नका ...
 
उगाचच या रूम मधून त्या रुम मध्ये जा. जे काम सांगितले जाईल तेच करा. स्वतः चे डोके वापरू नका ...
चव बघायला मिळेल तेव्हा चेहऱ्यावरचे भाव बदलत चव बघा .. निर्विकार चेहऱ्याने चव बघू नका ... सगळीच चव घालवाल ...
 
चव बघतांना,
- थोडं मीठ कमी वाटतंय ...
- जरा तिखट पाहिजे ...
असा अभिप्राय द्या.
 
सगळंच छान झालंय ...
असं एकदम म्हणू नका.
 
मी काही मदत करू का ? हे वाक्य दिवसा कमीत कमी ताशी चार वेळा तरी म्हणा ...
 
किती दमतेस तू ... हे वाक्य वेळ पाहून म्हणा.
आणि ब्राउनी पॉईंट्स मिळवा.
लाइटिंग च्या माळेचा गुंता खूप वेळ सोडवत बसा ...
 
बाहेरचे काम सांगितले कि जरा जास्त वेळ घ्या आणि घरी आल्यावर किती ऊन होते, ट्रॅफिक खूप होती ... हे सांगतांना दमलो आहे असा अभिनय करता करता पाणी प्या ...
 
बायको कोठे बाहेर गेली असेल, घरात नसेल तर अजिबात कोणत्याही कामाला हात लावू नका...
 
तिच्या अनुपस्थितीत तुम्ही कितीही कामं केली,
तरी ती कामं, काम म्हणून पकडली जात नाही... जे तिच्या डोळ्यांना दिसतं तेच काम...
 
- सिलेंडर बदलणे,
- माळ्यावरून मोठे पातेले काढणे,
- घट्ट झाकण उघडणे,
- किराणा लावणे,
- फर्निचर सरकवणे,
ही सगळी अत्यंत अवघड कामे आहेत असा अभिनय करा ...
 
मित्रां बरोबर पार्ट्यांची ही वेळ नाही...जरा धीर धरा ...
 
सोन्या चांदीच्या दुकाना जवळून गाडी जोरात घ्या.
 
प्रत्येक गोष्टीला,
- हो ...
- चालेल ...
- बरं ठीक आहे ...
- घेऊया आपण ...
हे असे म्हणत रहा.
 
या वेळी बायकोचा मूड हा सेन्सेक्स सारखा असतो खूप उतार चढाव होऊ शकतात. तो अपट्रेन्ड मध्ये असेल तर फायदा करून घ्या आणि डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर अजिबात रिस्क घेऊ नका . 
 
तिने केलेल्या फराळाची तुलना कोणाशीही करू नका. संध्याकाळी बाहेर जेवायला जा किंवा ऑर्डर करा.
 
आणि सगळ्यात महत्वाचे या अशा कामाच्या दगदगीत असले रिकामटेकडे लेख लिहीत बसू नका ...
 
हे सर्व वाचता वाचता लाडू वळून झाले असते...