शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 5 एप्रिल 2014 (16:53 IST)

मराठी विनोद : माझा गुन्हा काय ते तर सांग

बंडोपंत : अग्ग आगं... मला अशी लाटण्याने मारू नको... कॉय झालंय ते तर सांग..

ठमाकाकू : मी मुक्त स्त्री आहे आणि बदचलनी नवऱ्याचं वर्तन गप्प राहून अजिबात सहन करणार नाही.

बंडोपंत : अगं पण माझा गुन्हा काय ते तर सांग.

ठमाकाकू : तुमची सगळी थेरं कळतात मला. तुम्हाला इंग्लिश बोलणाऱ्या नटवीचे डोहाळे लागलेत हे काय कळतं नाही होय मला?

बंडोपंत : अगं पण...

ठमाकाकू : मग काय तर. त्यादिवशी तुम्हाला उशीर झाला म्हणून तुमच्या मोबाईलवर फोन लावला... तर कोणी सटवीनेच उचलला फोन आणि यॅयॅयॅयॅ करून इंग्लिशमध्ये म्हणाली..
'पर्सन यू आर कॉलिंग इज करंटली बिझी..!!