गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

जीवलागण

NDND
मी अख्खं भूमंडळ
पालथं घातलं असतं
तुझ्या डोळ्यात
मला हवा तो
भाव शोधण्यसाठी
मी आकाश-पाताळ एक केलं असतं
तुला माझ्यात गुंतवण्यासाठी
पण तू कसा क्षणात उतरविलास
माझा तोरा
वाटे कुणीतरी अलगद
फुलासारखा
झेलावा माझा जिव्हाळा
कैक जन्म माझे तयार होते
केवळ अशा एका क्षणावर
कुर्बान व्हायला
तू विचारलंस.....
तुझ्या मनात डोकावणारा
'तो' कोण
NDND
मी पुन्हा पुन्हा समजावेत
माझाच दृष्टिकोन
मी खरंच नव्हते का
तुझ्या खिजगणतीत
अन् मला वेडीला वाटायचं
तू स्रवतोयस आपली
जीवलागण
केवळ माझ्याचसाठी
मग हा दळभद्री आत्मसन्मानाचा
सोहळा तरी कशासाठी
असो, माझे खिन्न उसासे
मला खिजवत म्हणतील की
की तुझा जन्म यासाठी, याजसाठी
त्याने नवीन सावली शोधताच
उन्मळून पाडण्यसाठी.