करा अभ्यंगस्नान, सडा रांगोळी दारी
करा अभ्यंगस्नान, सडा रांगोळी दारी,
आला तो दिवस, ज्याची वर्षभर वाट पाही सारी,
"दिवाळी"आली गड्या वाजत गाजत,
हर्षोल्लोसा ने करा सारे दिवाळी च स्वागत.
गोडधोड, पंचपक्वान्न करा घरी, नैवेद्य दाखवा,
लक्ष्मीपूजन करून घरोघरी, पणत्या लावा,
स्वच्छ करा घर, अंगण सजवा रांगोळीने,
घाला दागिने अन नवनवीन वस्त्रप्रावरणे,
होईल माता लक्ष्मी तुम्हा आम्हावर प्रसन्न,
करा भलं सर्वांचंच, हेंच आहे मागणं!
..अश्विनी थत्ते