शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (19:10 IST)

अशीच आहे ती माझी सखी!

friends forever
न कधी पहीले, तरीही आहे ती,
   अशी ही एक सखी,
सदा साथ देते, प्रेमें वागते ती,
    आशी ही एक सखी,
एका सखी मुळे झाली आपली ती
     अशी ही एक सखी,
अंतर असलं किती तरी जवळ वाटते ती,
        अशी ही एक सखी,
न कोणती अपेक्षा न कोणती तक्रार करी ती,
   अशी ती एक सखी,
अशीच असावी तिची अन माझी मैत्री, 
अशीच आहे ती माझी सखी!
..अश्विनी थत्ते