शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (17:42 IST)

करी नारी उपवास, घाली देवीला साकडे!

करी नारी उपवास, घाली देवीला साकडे!
"पर"नारी शी तीचे काग सदाच वाकडे?
नवरात्रीस येतो उत त्यासी भारीच,
ओटी भरण्याची ही तिची रीत ही न्यारीच,
जाते गर्दी मध्ये, टाकते उसासा ती ग!
दुसऱ्या नारीची करते, निंदा नालस्ती ग !
घर स्वतःचे सांभाळते लीलया, जपून जपून,
पटवते दुसऱ्याच्या पतीस, घात करी ठरवून!
असं कस ग काळीज तिचं, काय म्हणावं ग ह्याला!
हीच का तीच, हा प्रश पडी माझ्या मनाला!
अशी कशी तुझी भक्त वागू शके अशी?
अशी तिची भक्ती तुजला पोहचतेच बरं कशी?
दे तिज ही सुबुद्धी, मन जाणण्या एका स्त्री चे!
मगच स्वीकार तिज, पुरे कर मनोरथ तिचे!
.....अश्विनी थत्ते