Marathi Kavita : चूक घडतंय हे दिसतं असतं डोळ्याला
चूक घडतंय हे दिसतं असतं डोळ्याला,
तरीही चूप का बसायचं?हा प्रश पडतो मनाला!
आपण भ्यायचं असायचं असतं का?
की कशीबशी बसलेली घडी विस्कटेल का?
मग सत्य असंच मरेल न गुदमरून,
आजवरच्या आपल्या संस्कारांची पायमल्ली करून,
नाही नाही कुठंतरी यावर विचार व्हायला हवा,
हा प्रश आता निकालात काढायला हवा!
समोरचा अजून अजून उद्दाम होईल, निःसंशय,
दाबेल स्त्यास तो, येईल बेईमानी चा प्रलय!
..अश्विनी थत्ते.