1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (14:30 IST)

Marathi Kavita जसा जसा काळ पुढं पुढं जातो

marathi poem
जसा जसा काळ पुढं पुढं जातो,
नकळत आपण ही बदलत असतो,
बदल कधी नक्की घडला सांगता नाही येत,
आपणही ते कधी मनावर नाही घेत,
पण काळच शिकवतो, रीत जगाची,
शिकवण देतो, कुठं न कशी वागायची,
सुरवातीला मन धजत नसतं, काळानुसार वागायला,
पण नंतर ते ही बेडर होतं, न लागतं ते  करायला,
सगळेच म्हणतात तू आधी अशी नव्हती वागत,
पण आलेले अनुभव, तेच असतात न सोबत!
मागे वळून बघितलं की आपल्यास ही समजतं,
कोण होतो आपण अन काय झालो, तेही कळतं!
..अश्विनी थत्ते.