दारी दरवळला सुगन्ध, काय करू सुचेना!
दारी दरवळला सुगन्ध, काय करू सुचेना!
फुलला मोगरा भरभरून, एक दिवसाचा पाहुणा,
तो आला अन मन आनंदाने घेई भरारी,
दिमाखात उभी आहे दारी, मोगऱ्याची स्वारी!!
काय जादू आहे, मज नाही नक्की ठावं,
कधी कधी वाटे मनी, आपण मोगरा व्हावं,
फुलावं एकदिवस, आहे ते द्यावं भरभरून!
ओळखावं लोकांनी आपल्यास मोगरा म्हणून,
आस जास्त नाही, मिळेल आयुष्य एकदिवसाचे,
आठवणीत राहीन लोकांच्या,सुंदर रूप तयाचे!
....अश्विनी थत्ते