सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (22:28 IST)

तुझ्या मिलना साठी,झालो की ग धुंद

नभा च्या या अंगणी, कुणीही मज ना दिसले,
तारकांचे हितगुज आपापसांत होतं चालले,
मोह आज मजशी पडला, यावं समीप तुझ्या,
घेण्यास तुझं चुंबन हे धरित्री,आशा पालावल्या माझ्या,
कुष्ठ वृक्ष ही बघ कसा दटावण्यास सरसावला,
गेलो दोन पावले मी मागे, राग मनी आला,
शुभ्र रूप माझं बघ झाले लालबुंद,
तुझ्या मिलना साठी,झालो की ग धुंद,
येईन निश्चित पुन्हा,समीप तुझ्या हे आश्वासन घे,
नभोमंडपी सजेल असें क्षण जेव्हा,मज जवळी घे!
..अश्विनी थत्ते