गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (18:49 IST)

माझं बालपण

ताई (आजी) ची माया, आई चि छाया. अप्पांचे लाड, बाबांचे ठाठ. 
ताईचा स्वयंपाक, आई चा अभ्यास. अप्पांच्या गोष्टी, बाबांची दोस्ती.
पूजापाठ आणि कुळधर्म-कुलाचार, छोट्या-श्या घरात, पाहुण्यांचे मोठे पाहुणचार. 
ताईच्या प्रेमाचे लाड, गरमा-गरम जेवण आणि प्रेसबंद कपडे हाथोहाथ. 
अप्पांच्या गोष्टी खुपच खास, इंदोर ते ग्वालियर सायकल चा प्रवास. 
बाबांचा होय बेफिक्र आणि स्वच्छंद स्वभाव, आमचं स्वालंबी जीवन त्याचाच प्रभाव. 
गारव्यात खालले शेकलेले बटाटे आणि मटार लागे मस्त, जसे अप्पांच्या कुशीत ऐकलेल्या लाकुडधार चि गोष्ट. 
ताईच्या पूरणपोळी चा स्वाद किती खास, घाईत निघतांना भरवलेला तिने नेहमी प्रेमाचा घास. 
आईची भराभरा कामं आटपून शाळेला जायची तैयारी, स्वतःच्या मुलींसोबत शाळेच्या गरीब मुलांच्या अभ्यासाची पण जवाबदारी. 
बाबांचे सायकलच्या करीयर वर आणलेले बर्थडे केक, आईला नसांगता रिजल्ट ला दिलेले कितीतरी सिग्नेचर फेक. 
ताई अप्पांने ने दिले प्रेम ओतून, आईने शिकविले अनुशासन, बाबांनी जीवन जग मनापासून. 
मिळु दे देवा सर्व मुलांना असच मस्त बालपण, असल्या प्रेमाची गरज भरत नसते तरुण झाल्यावर पण. 
माझ्या आई, पापा आणि ताई-अप्पा नां समर्पित
 
सौ. तृप्ती दांडेकर