1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (13:08 IST)

"नभ भरून हे आले"

rain poem
"नभ भरून हे आले" 
नभ भन हे आले मेघ बरसून गेले 
मन पाखरू होऊन पावसात चिंब झाले
कसे अंधारून आले ढगा मागे ढग उभे
एका एका या ढगांचे कोटी कोटी थेंब झाले
 सृष्टी न्हाऊन निघाली जणू नवी रंगवली
कोण रंगवून गेले कोणा कोणा ना दिसले
एक बकुळीची कळी पाना मागे का लपली
भिजल्या अंगा लाजली राना रानाला कळले
इंद्रधधनुषाचा झोपाळा आकाशी हा बांधीयला
मन त्यावरी बसून हळूहळू हिंदोळले
नदी बेभान होऊन सागराकडे निघाली
मिलनाची ओढ मनी जीव जीवात गुंतले
© मधुरिमा