गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (15:29 IST)

वाचनवेड

वाचनवेड
वाचाल तर वाचाल हा
ध्यानी ठेवून मंत्र
लक्षात घेवू वाचनाचेही
आहे एक तंत्र
 
थोर पुरूषांचे चरित्रातू
घेवू या स्फूर्ती
मुलांनाही सांगू 
त्यांची महान किर्ती
 
संताने दिली समाजाला 
चांगली शिकवण
त्यांच्या विचारांची मनी 
करू या साठवण
 
बालगीत निसर्गगीतही
आनंदाने वाचू
सुचेल तसे काव्य
मग आपणही रचू
 
जोपासूया वाचनाचा 
हा छानसा छंद
मिळेल त्यातून नक्कीच
आपल्याला स्वानंद..
     
 सौ. माधवी मिलींद खडक्कार..