testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अभिनव कथाकथन आणि कवितांनी मिळवली प्रशंसा

chetan fadnis
Last Modified बुधवार, 31 ऑगस्ट 2016 (12:39 IST)
हिंदी साहित्य समितीच्या परिसरात रविवारी आम्ही रचनाकाराच्या माय मावशी कार्यक्रमात यंदा मराठी रचनांची वेळ होती.


युवा पिढीचे कवी चेतन फडणीस यांच्या कवितांनी जेथे भरपूर प्रशंसा मिळवली तसेच वरिष्ठ कवयित्री रंजना मराठे यांच्या कविता देखील वयाचे अनुभव जाणवले. घर गाळतंय यात युवा रचनाकार चेतनने फारच सुंदररीत्या कवी आणि कवितांमध्ये संबंध आणि कवीच्या
वैयक्तिक जीवनाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जुनी पेटी शीर्षक असणार्‍या कवितेला प्रेक्षकांनी फार वाहवाही लुटली. परिस्थितीशी लढणारी एक आई आपल्या मुलांचे प्रश्न आणि जिद्दीचे कसे उत्तर देती या विषयावर बनलेली कविता बालहठ देखील फारच प्रभावी बनली होती.

गणेशोत्सवाच्या तयारीच्या वेळेस वरिष्ठ कवयित्री रंजना मराठेने आपल्या कवितांची सुरुवात गणेश वदंनेने केली. त्यांच्या कवितेत जेथे एकीकडे मावळत्या सूर्याची गोष्ट फारच प्रभावशाली पद्धतीने ठेवण्यात आली होती तर दुसरी कडे एकटे राहण्याचे सुख काय असतात हे देखील रंजनाजींनी फारच रोचक पद्धतीने आपल्या कवितेत सांगितले होते. आपली मराठी तुकांत कवितांमध्ये त्यांनी फारच सुंदररीत्या पावसाचे महत्त्व सांगितले होते. शब्दांनी जेथे संबंध जुळतात तसेच ह्याच शब्दांचा चुकीचा वापर केला तर ह्याने संबंध संपुष्टात देखील येतात. याच विचारांना रंजना मराठे यांनी अत्यंत कुशलतेने आपल्या कवितेत सांगितले.

आम्ही रचनाकाराचे नवीन साहित्य प्रयोग प्रेक्षकांना पुढील कार्यक्रमात बघायला मिळाले जेथे प्रयास नाट्य संस्थेच्या कलाकारांनी कथेला फारच मनमोहक कथाकथनच्या पद्धतीने सादर केले. वैशाली पिंगळे यांच्या दोन कथा नाव नसलेलं नातं (अनामिक रिश्ता) आणि पाणी पाणी रे (पानी पानी रे)वर प्रभावशाली पद्धतीने मुकुंद तेलंग, वसंत साठे, रेणुका पिंगळे , श्रेया वेरुळकर आणि अपर्णा चांसरकर यांनी प्रस्तुती दिली. कथाकथनाचे निर्देशन मुकुंद तेलंग यांनी केले. सामान्यरूपेण कथाकथन एका व्यक्तीद्वारे कथेची प्रस्तुती असते पण येथे पूर्ण दलाने फारच भावप्रवणपद्धतीने आपल्या पात्राला प्रेक्षकांसमोर ठेवले. ही प्रस्तुती नाट्य आणि कथाकथनाचे अद्वितीय मिश्रण होते ज्याने कथेची शोभा अधिकच वाढवून दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचलन वैभव पुरोहित यांनी केले.

माय मावशी कार्यक्रमाची संकल्पनेत हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत लिहिणारे रचनाकारांना व्यासपीठ दिला जातो. नियमित आणि
अनौपचारिक बैठकींमध्ये बरेच नवीन लेखक समोर येतात ज्यांना माय मावशी शृंखलेत आपल्या रचना प्रस्तुत करण्याची संधी मिळते. मागील 15 वर्षांपासून अनौपचारिक कथा आणि काही सार्थक आयोजनांशिवाय कथा व साहित्याच्या विविध परिणामांबद्दल वैचारिक आदान प्रदान आणि भाषेची तांत्रिक समृद्धीवर विशेष कार्य करण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :

रेस्टॉरंटमध्ये रोबोट बनले वेटर

national news
चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची ऑर्डर घेण्यापासून ते त्यांचे पदार्थ सर्व्ह करून बिल ...

खबरदारीचा उपाय, कॉसमॉसचे एटीएम दोन दिवस बंद

national news
कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे बँकेचे तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये चोरण्यात आले ...

स्वातंत्र्याचा अर्थ

national news
स्वातंत्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणून आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, ...

15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल

national news
उत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ...

पुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा

national news
पुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ...