testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये

marathi sahitya sammelan
पुणे| wd| Last Modified मंगळवार, 1 जुलै 2014 (17:17 IST)
यंदा पंजाबमध्ये मराठी सारस्वतांचा मेळा भरणार आहे. 88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संत नामदेव महाराजांची कर्मभूमी असलेल्या पंजाब राज्यातील घुमान येथे रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची आज (मंगळवार) पुण्यात बैठक झाली. संमेलन स्थळ निवडीवर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्‍यात आला.

साहित्य संमेलनाच्या आयोजनाची तयारी दर्शवणारी विक्रमी दहा निमंत्रणे यंदा महामंडळाकडे आली होती. त्यातून पंजाबमधील अमृतसरजळील 'घुमान' गावात संत नामदेव गुरुद्वारा सभेच्या निमंत्रणाचा स्वीकार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


जानेवारी 2015 मध्ये होणार्‍या साहित्य संमेलनासाठी गुजरातमधील बडोद्यातील मराठी वाड्मय परिषदेने निमंत्रण दिले होते. तसेच शाहुपुरी शाखा, मसाप, सातारा, सार्वजनिक वाचनालय - कल्याण, कळवे येथील जवाहर वाचनालय - ठाणे, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान - कणकवली, रात्र पाठशाळा समिती - जालना, उस्मानाबाद मसाप शाखा, कल्याण शिक्षण संस्था तळोशी - चंद्रपूर, आगरी यूथ फोरम - डोंबिवली येथूनही निमंत्रणे आली होती.

यंदाचे 88 वे संमेलन मराठवाड्यात व्हावे, या मागणीने जोर धरला होता. यंदा उस्मानाबादमधील मराठी साहित्या परिषदेच्या शाखेने ही मागणी केली होती. विशेष म्हणजे मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले पाटील यांनी यंदाचे संमेलन मराठवाड्यात व्हावे, असा आग्रही होते. मात्र, पंजाबने यंदा मराठवाड्यावर
मात केली.


यावर अधिक वाचा :

टीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार

national news
टाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...

मज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका

national news
आता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...

नाणार होणार नाही: उद्धव ठाकरे

national news
नाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...

नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला

national news
नवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...

अबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी

national news
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...